सांगोला :
सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथील बंडगरवाडी नजीक घडलेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कटफळ येथील ६ महिला मजूरांच्या कुटुंबीयांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी कार्यतपस्वी आमदार स्व.काकासाहेब साळुंखे-पाटील ट्रस्टच्या वतीने प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली असून या अपघातात जखमी झालेल्या महिला मजुरांनाही उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे.
कटफळ (ता.सांगोला) येथील मृतांच्या नातेवाईकांना ही आर्थिक मदत देतेवेळी जेष्ठ नेते वसंत जरे, विजयदादा येलपले,पंढरीनाना भोसले,बाळासाहेब सराटे,कृष्णदेव सावंत,शहाजी करचे,कैलास खबाले,दिलीप नागणे,विठ्ठल नाना बागल,देवदत्त भोसले,गोवर्धन गोडसे,दादासाहेब घाडगे,महादेव कांबळे,नितीन रणदिवे,रवींद्र कांबळे,बापूसाहेब चव्हाण,प्रकाश खरात,शहाजी खरात,सोमनाथ खरात,शहाजी माने,दत्तात्रय बंडगर,सुभाष हांडे,संतोष पोतदार,सुदर्शन पुजारी,दादासाहेब शेळके,विलास पडळकर,दीपक धांडोरे,परमेश्वर हाके,औदुंबर भोसले यांच्यासह मृतांच्या परिवारातील सदस्य,त्यांचे नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार दीपकआबा म्हणाले की,चिकमहुद (ता.सांगोला) येथे घडलेला अपघात हा फक्त अपघात नसून तो संपूर्ण सांगोला तालुक्यातील जनतेच्या मनावर झालेला आघात होता.अत्यंत गरीब परिस्थिती असल्याने हातावर पोट असणाऱ्या महिला मजुरी करुन आपला आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होत्या.काळाने जरी या परिवाराला एकटे सोडले असले तरी,आम्ही मृतांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही. मृतांच्या परिवारातील कुणालाही कसलीही गरज असेल तर,अगदी अर्ध्यारात्री त्यांनी आपल्याला हाक मारली तरी,आपण त्यांच्या मदतीसाठी तत्पर राहू.कार्यतपस्वी आमदार स्व.काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. स्वर्गीय काकासाहेबांनी नेहमी,संपूर्ण तालुका हाच आपला परिवार मानला होता.तालुक्यातील जनतेला अडचण आली तर,ती प्रत्यक्ष आपल्या कुटुंबातील सदस्यांची अडचण आहे, असे मानून आपण नेहमीच गोरगरीब जनतेच्या सेवेत कार्यरत राहू आणि शेवटच्या क्षणापर्यंत कार्यतपस्वी आमदार स्व.काकासाहेब यांच्या याच विचारांवर आपण काम करणार असल्याचे यावेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी आवर्जून नमूद केले.
—————————————————————
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळवून देणार :
मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली म्हणून त्यांच्या कुटुंबातील गेलेले सदस्य पुन्हा परत येणार नाही,याची जाणीव आहे.तरीही,अशा दुःखद प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांसोबत ठाम उभे राहून त्यांना या दुःखातून व अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केवळ या मदतीवर थांबणार नाही तर,राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच स्व.गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजनेच्या माध्यमातून सबंधित परिवाराला आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.याचा पाठपुरावा करुन जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. – दीपकआबा साळुंखे-पाटील
——————————————————————————

More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने