राजकीय

भोपसेवाडीत शेकापला खिंडार,दीपकआबांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

 

सांगोला :

      माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर सांगोल्यात शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांची रांगच लागली असून तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशांचा धडाका सुरु आहे.भोपसेवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शेकापला अखेरचा लाल सलाम करत शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला असून आगामी विधानसभा निवडणुकीत दीपकआबा साळुंखे-पाटील यांना आमदार करुन पुन्हा एकदा सांगोला तालुक्यावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार या कार्यकर्त्यांनी केला.

      दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सांगोला विधानसभा मतदारसंघातील अनेकांचे पक्षप्रवेश धडाक्यात सुरु आहेत.दीपकआबांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेचे पक्ष संघटन अधिक मजबूत स्थितीत उभे राहिले आहे.सांगोला तालुक्यातील भोपसेवाडी येथील सुनील बाळू गावडे,संतोष बाळू गावडे,सागर बाळू गावडे,अनिल शामराव गावडे,कुमार शामराव गावडे यांच्यासह शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करुन मशाल हातात घेतली आहे.

यावेळी दीपकआबा साळुंखे-पाटील यांचे खंदे समर्थक कुमार नायकुडे, सुरेश गवंड,नंदू वगरे,सुनील गावडे,अनिल गावडे, विशाल आगलावे,शिवाजी कोळेकर,नितीन बुरंगे आदी उपस्थित होते.
—————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button