सांगोला :
सांगोला तालुक्यातील घेरडी,सोनंद व पारे या तीनच गावांचा पूर्वी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमध्ये समावेश होता.परंतु, सातत्याने पाठपुरावा केल्याने तालुक्यातील नवीन ८ वंचित गावांचा समावेश केला असून आता,म्हैशाळ योजनेमध्ये एकूण ११ गांवांचा समावेश झाला आहे. घेरडी,सोनंद,पारे या जुन्या तीन गावांसह वाकी घेरडी,वाणी चिंचाळे,आलेगाव, मेडशिंगी,जवळा,तरंगेवाडी,भोपसेवाडी व आगलावेवाडी या ८ गांवांचा नव्याने समावेश होऊन या सर्व गावांना ३५० एमसीएफटी पाणी अधिकृत मंजूर झाले आहे.एकूण ११ गांवांबरोबर पारे,हंगिरगे, जवळा व नराळे येथील ४ ल.पा.तलाव भरुन देण्याबाबत शासन निर्णय झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
तसेच म्हैशाळ योजनेतून कोरडा नदीवरील गळवेवाडी ते वाढेगांव पर्यंत असणारे १३ को.प.बंधारे वर्षातून दोन वेळा भरुन घेण्याकरिता २०० एमसीएफटी पाणी मंजूर झाले आहे.यामुळे गळवेवाडी,सोनंद, जवळा, कडलास,आलेगाव,मेडशिंगी ते वाढेगांव अशा ७ गांवांना याचा मोठा फायदा होणार आहे,असेही आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.म्हैशाळ योजनेतील ११ गावांना बंदिस्त नलिकेतून पाणी देण्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार होत असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवून येत्या २ महिन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
———————————————————————————
एकूण १.३५० टीएमसी पाणी मंजूर झाल्याने आनंद :
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खास. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभारी असून सांगोला तालुक्यातील सर्व वंचित गांवातील शेतकऱ्यांना म्हैशाळ योजनेतून पूर्वीचे ८०० एमसीएफटी व नवीन ५५० एमसीएफटी असे एकूण १.३५० टीएमसी पाणी मंजूर झाल्याने आनंद झाला आहे.
– आमदार शहाजीबापू पाटील
———————————————————————————
More Stories
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा
स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिन व जयंती दिनानिमित्त सांगोल्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन