दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपालिकेतील सफाई कामगारांना ब्लॅंकेट वाटप

सांगोला :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सांगोला शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगोला नगरपालिकेतील १३१ सफाई कामगारांना उबदार ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

सध्या हिवाळ्याचे दिवस असून दिवसेंदिवस थंडीमध्ये वाढ होत असल्याने वाढत्या थंडीपासून बचावासाठी सफाई कामगारांना उबदार ब्लँकेट वाटप करण्यात आले. या ब्लँकेट वाटप कार्यक्रमाला माजी नगरसेवक तथा गटनेते सचिन उर्फ सोमनाथ लोखंडे,पुणे शहर भा.ज. पा.ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष प्रतीक खताळ, उद्योगपती दिलीप मस्के,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांगोला तालुका महिला कार्याध्यक्षा सुचिताकाकी मस्के,बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागासवर्गीय आघाडीचे सांगोला ता.अध्यक्ष चंचल बनसोडे,सोमनाथ ठोकळे,नागेश लोखंडे, सोमनाथ बनसोडे,महादेव बनसोडे,सुरज मुलाणी, ठेकेदार शेट्टी यांच्यासह सांगोला नगरपालिकेतील विविध विभागातील प्रमुख तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————————————

शिकवण दिपकआबांची व उपक्रम शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा :

जगभरामध्ये हाहा:कार माजविणाऱ्या कोरोना सारख्या महाभयंकर महामारीमध्ये आरोग्य व सफाई याचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे सर्वांना कळाले असून आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र कष्ट करणाऱ्या व जिल्ह्यासह राज्यातही सांगोला नगरपालिकेला स्वच्छता व सफाईबाबत मानांकन मिळवून देणाऱ्या सफाई कामगारांना थंडीच्या दिवसांमध्ये उब मिळावी व त्यांच्या आरोग्याची काळजी व्हावी,या हेतूने सांगोला शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दीपकआबा यांच्या शिकवणीतून व संस्कारातून हे उबदार ब्लँकेट वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले होते.
– सोमनाथ उर्फ सचिन लोखंडे (गटनेते तथा मा.नगरसेवक)