महत्वाच्या बातम्या

मुंबई शहर तालीम संघातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पै.विक्रम भोसले व पै.बालाजी मेटकरी यांची निवड

 

मुंबई/प्रतिनिधी :

येत्या आठवडाभरात पुणे येथे पार पडणार्‍या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मुंबई शहर तालीम संघाकडून सांगोला तालुक्यातील पै.विक्रम भोसले व पै.बालाजी मेटकरी यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई शहर तालीम संघाच्या वतीने देण्यात आली.

मौजे फुलगाव (पुणे) येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूल,येथे ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दि.४ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत संपन्न होत असून या कुस्ती स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी मुंबई शहर तालीम संघाच्या वतीने भारतीय क्रीडा मंदिर वडाळा येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीची स्पर्धा मुंबई शहर तालीम संघाचे कार्याध्यक्ष संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुंबई शहर तालीम संघाचे उपाध्यक्ष शशिकांत भाऊ देशमुख व सरचिटणीस प्रकाश तानवडे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी, पंचाचे काम रामचंद्र पाटील,बाळू काळे,नामदेव बडरे, बाबाजी गुरव,नथुराम चव्हाण,तुकाराम गडकरी आणि सुभाष घेरडे यांनी पाहिले.

या स्पर्धे दरम्यान मुंबई शहर तालीम संघाचे उपाध्यक्ष शशिकांतभाऊ देशमुख यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल,श्रीफळ व फेटा बांधून विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी,महाराष्ट्र केसरी बापूसाहेब लोखंडे व उपमहाराष्ट्र केसरी तानाजी बनकर तसेच छत्रपती पुरस्काराचे मानकरी नामदेव बडरे आदी मान्यवर उपस्थित होते.


————————————————
मुंबई शहर तालीम संघाच्या वतीने गादी व माती विभागातून निवड करण्यात आलेले पैलवान :

* गादी विभागातील पैलवान :

* ५७ किलो – पै.प्रमोद पाटील,
* ६७ किलो – पै.नामदेव घाडगे,
* ६५ किलो – पै.अमोल बारंग,
* ७० किलो – पै.जयदिप बडरे,
* ७४ किलो – पै.प्रताप माने,
* ७५ किलो – पै.अनिष चव्हाण,
* ८६ किलो – पै.सचिन काळे,
* ९२ किलो – पै.दिनेश पवार,
* ९७ किलो – पै.सुरज सर्जेराव पाटील.

* महाराष्ट्र केसरी गटासाठी गादी विभागातून
पै.बालाजी मेटकरी यांची निवड करण्यात आली.

* माती विभागातील पैलवान :

* ५७ किलो – पै.अक्षय पावळे,
* ६७ किलो – पै.अभिजीत बोडके,
* ६५ किलो – पै.साहिल मुलाणी,
* ८० किलो – पै.ललीत पाटील,
* ७४ किलो – पै.अमित घाडगे,
* ७९ किलो – पै.प्रकाश काळे,
* ८६ किलो – पै.सुरज पाटील,
* ९२ किलो – पै.उदय जोंधळे,
* ९७ किलो – पै.सचिन महागावकर,
तसेच महाराष्ट्र केसरी गटासाठी माती विभागातून पै.विक्रम भोसले यांची निवड करण्यात आली.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button