महत्वाच्या बातम्या

पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी – अ‍ॅड.गजानन भाकरे

सांगोला :

पुणे विभाग पदवीधर मतदार संघासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून जास्तीत जास्त पदवीधरांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन मतदार नोंदणी करावी,असे आवाहन सांगोला येथील माजी नगरसेवक अ‍ॅड.गजानन भाकरे यांनी केले आहे.

पुणे विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक येत्या कांही काळात संपन्न होणार असून या निवडणुकीमध्ये योग्य व सक्षम प्रतिनिधी निवडून देणेसाठी मतदार यादीमध्ये नांव नोंदविणे गरजेचे आहे. या नोंदणी प्रक्रियेस सध्या, सुरुवात झाली असून पात्र पदवीधरांनी स्वतःची व आपल्या कुटुंबातील सर्व पात्र पदवीधरांची नोंदणी करावी व लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन अ‍ॅड.गजानन भाकरे यांनी केले आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button