महत्वाच्या बातम्या

BREAKING NEWS : राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता

 

सातारा :

                      राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे हे अचानक बेपत्ता झाले असून त्यांनी नीरा नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बुधवारी दुपारी ते पुण्याहून सातारा येथे जाण्यासाठी निघाले होते. घोरपडे यांचे शेवटचे लोकेशन शिरवळ येथे दिसून आले असून शिरवळ येथील नीरानदीच्या पात्रालगत एका हॉटेलपासून एक व्यक्ती चालत पूलाकडे जात असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे,याप्रकरणी त्यांच्या नातेवाईकांकडून घोरपडे हे हरवल्याची तक्रार शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी पहाटे देण्यात आली आहे.

राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे हे अचानकपणे बेपत्ता झाले असून त्यांनी सारोळा (ता.भोर) येथील निरा नदीमध्ये उडी मारल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असल्याने निरा नदीपात्रामध्ये युद्धपातळीवर शोध कार्य सुरु असून घटनास्थळी वरिष्ठ अधिकारीही दाखल झाले आहेत.

सदर घटनास्थळी मिसिंग अधिकारी शशिकांत घोरपडे यांचे नातेवाईक आणि राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील,पोलीस नाईक गणेश लडकत, शिरवळ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक वृषाली देसाई आणि सहाय्यक उपनिरीक्षक अनिल बारेला आदी उपस्थित होते.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button