महत्वाच्या बातम्या

सांगोला रोटरी क्लबच्या वतीने पोस्ट डे साजरा

 

सांगोला :

सांगोला येथील रोटरी क्लबच्या वतीने नुकताच राष्ट्रीय पोस्ट दिवस (पोस्ट डे) साजरा करण्यात येवून सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचा सन्मान करुन त्यांच्या कामाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना सांगोला पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर श्री.गायकवाड यांनी पोस्टाचं काम कशा पद्धतीने चालते ? हे कथन करुन कोणाच्याही शाबासकीची अपेक्षा न करता, आपल्याच कामात मग्न राहून आमचे लोक काम करतात. त्यातूनही अपेक्षा नसताना रोटरी क्लबने आमच्या कामाबद्दल शाब्बासकी दिली,याबद्दल रोटरीच्या या कार्याचे त्यांनी आभार व्यक्त केले.

यासमयी,मंगळवेढा पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर चव्हाण म्हणाले की, आपण अचानकच आज या पोस्ट डे कार्यक्रमानिमित्त आलो आणि मला अशा चांगल्या आनंदी कार्यक्रमात सहभागी होता आले.आपल्या चांगल्या कामाची कोणीतरी दखल घेत असते आणि सांगोल्यामध्ये रोटरीने हे काम केले,असे सांगून रोटरीचे धन्यवाद व्यक्त केले.

यावेळी रो.माणिक भोसले यांनी पोस्ट खात्याचा इतिहास सांगितला.तसेच रोटरी क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पोस्ट डे च्या कार्यक्रमातच प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यासाठी रोटरीच्या वतीने असा संदेश लिहिलेली एक -एक पिशवीही भेट देण्यात आली.

सदर कार्यक्रमात टपाल खात्याच्या सर्व कर्मचाऱ्यांबरोबरच रोटरीचे अध्यक्ष डाॅ.साजिकराव पाटील, रो.हमीदभाई शेख,रो.बशीरभाई, रो.नागेश तेली,रो.धनाजी शिर्के,रो.ज्ञानेश्वर कमले,रो.अमर जाधव आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष डाॅ. साजिकराव पाटील यांनी केले तर, आभार शरणप्पा हळळीसागर यांनी मानले.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button