महत्वाच्या बातम्या

जवळा येथील साळुंखे कुटूंबियांचा संसार आगीत भस्मसात

सांगोला :

                  सांगोला तालुक्यातील जवळा परिसरातील शेखवस्ती येथील रहिवासी संभाजी मसू साळुंखे व संजय संभाजी साळुंखे यांचे राहत्या घराला अचानक आग लागल्याने साळुंखे कुटूंबियांचा संसार आगीत भस्मसात झाल्याची घटना नुकतीच घडली.या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन अशा दुर्दैवी प्रसंगात त्यांना स्वतःही मदतीचा हात दिला.

जवळा येथील शेखवस्तीत राहणारे साळुंखे कुटुंबीय हे अतिशय गरीब कुटूंब असून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी ते दररोज रोजंदारीवर कामाला जातात. घटनेच्या दिवशीही ते नेहमीप्रमाणे कामाला गेले असता, घराला अचानक आग लागल्याने ही दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.परंतु, आयुष्यभर कष्ट करुन उभे केलेल्या घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू या आगीत जळून खाक झाल्यामुळे साळुंखे कुटुंबिय उघड्यावर पडले होते. त्यांना घरकुलही मंजूर झाले होते पण,घरकुल लांबणीवर पडत असल्यामुळे गांवातीलच बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन घर बांधण्यासाठी त्यांनी कांही रक्कम घरातच ठेवली होती,ती रक्कमही दुर्दैवाने या आगीत जळून खाक झाली.

अतिशय गरीब परिस्थिती असलेल्या या कुटुंबावर असा दुर्दैवी प्रसंग आल्यामुळे संपूर्ण जवळा गांव व परिसरातील लोकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.सदर घटनेचा पंचनामा करुन गांव कामगार तलाठी माळी भाऊसाहेब यांनी वरीष्ठांकडे अहवाल सादर केला आहे. पीडित साळुंखे कुटुंबीयांना सर्व संसारोपयोगी साहित्य तसेच घरातील सर्व सदस्यांना कपडे व अन्नधान्य यांची मदत देवून माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनीही आपला हातभार लावला.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button