शैक्षणिक

न्यू इंग्लिश स्कूलचे नुतन प्राचार्य केशव माने व उपमुख्याध्यापक संजय शिंगाडे यांचा सत्कार संपन्न

 

सांगोला :

सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेजचे नुतन प्राचार्य केशव माने व उपमुख्याध्यापक संजय शिंगाडे यांची सेवाज्येष्ठ्ते नुसार पदोन्नती झाल्याबद्दल सांगोला विद्यामंदीर फिजिक्स फ्रेंडस तर्फे या दोघांचाही सत्कार करण्यात आला.

प्रा.केशव माने यांनी ज्युनि.कॉलेजमध्ये फ़िजिक्स विषयाचे दीर्घकाळ अध्यापन केले आहे.तसेच संजय शिंगाडे यांनीही ज्युनि.कॉलेज मध्ये बायोलाॅजी या विषयाचे अध्यापन केले आहे.इयत्ता बारावी शास्त्र या वर्गाच्या प्रॅक्टिकल परीक्षा तसेच पुणे येथे पूर्वी होणारी बारावी शास्त्र या वर्गाची पेपर तपासणी या कामी सर्वांनी मिळून एकत्रित काम केले आहे.

त्यामुळे,केवळ सांगोल्यातीलच नव्हेतर,संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांचे ऋणानुबंध दृढ झाले असून आपल्या मित्र परिवारांपैकी दोघेजण न्यू इंग्लिश स्कूल शाळेत प्राचार्य व उपमुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत,ही बहुमानाची गोष्ट असल्याचे मत यावेळी प्रा.राजेंद्र ठोंबरे यांनी व्यक्त केले.तसेच आपापल्या विषयातील अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक शास्त्र शिक्षकांनी आपापल्या विषय शिक्षकांचे व्हाटस ग्रुप तयार करुन एकमेकांच्या संपर्कात राहावे,अशी अपेक्षा प्रा.प्रकाश धोत्रे यांनी व्यक्त केली.विशेष म्हणजे प्रा.ठोंबरे व प्रा.धोत्रे हे सांगोला विद्यामंदीर ज्युनियर कॉलेजमध्ये फिजिक्स विषयाचे अध्यापक होते.

                       प्रा.खटकाळे यांची संस्था सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल यावेळी त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी,सेवानिवृत्त शिक्षक प्रा.अमर गुळमिरे यांच्यासह न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु.कॉलेजमधील फिजिक्स व बायोलॉजी विषयाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button