राजकीय

आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दीपकआबा व शेकाप पुन्हा एकत्र येण्याची शक्यता – बाबासाहेब कारंडे

 

सांगोला :

          सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व.गणपतराव देशमुख यांना २०१९ पूर्वीच्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांची मोठी मदत झाली असून शेकापमुळे त्यांचाही यापूर्वी बराच फायदा झाला आणि नुकसानही झाले असल्याचे सांगत स्व.गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर पार पडलेल्या सांगोला सूतगिरणी व खरेदी विक्री संघ या सहकारी संस्थांच्या निवडणुकीतही दीपकआबांची शेकापला मोठी मदत मिळाल्याचा उल्लेख करुन आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दीपकआबा व शेकाप हे पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकत्र येण्याची शक्यता शेकापचे जेष्ठ नेते बाबासाहेब कारंडे यांनी पत्रकार परिषदेत वर्तविली.

शेकापप्रणित पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी ८ फेब्रूवारी रोजी सोलापूर जि.प.समोर झालेल्या आंदोलनावेळी बोलताना,”२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापला मोठी मदत केल्याचे सांगीतले”,याचीही आठवण बाबासाहेब कारंडे यांनी यावेळी करुन दिली. शेकापचे जेष्ठ नेते बाबासाहेब कारंडे यांनी “२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दीपकआबा व शेकाप हे पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवल्याने शेकाप, शिवसेना व भाजपासह इतर पक्षातील कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या असून बाबासाहेब कारंडे यांनी “पत्रकार परिषदेच्या माध्यमातून टाकलेली ही गुगली तालुक्याच्या राजकारणात क्या रंग लायेगी ?” हे येणारा काळच सांगेल.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button