सामाजिक

सांगोला रोटरी क्लबच्या वतीने राजापूर आश्रम शाळेत वृक्षारोपण संपन्न

 

सांगोला :

श्री चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ,सांगोला संचलित, राजापूर येथील सुंदर आश्रम शाळेत सांगोला रोटरी क्लबच्या वतीने ५ जुलै रोजी १०० रोपे प्रदान करुन प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी,आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अनिल कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.रोटरी क्लब नियमितपणे अनेक सामाजिक उपक्रम घेत असून आश्रम शाळेस त्यांचे नेहमी सहकार्य असते,यापूर्वी मागील वर्षीही रोटरी क्लबने आमच्या आश्रम शाळेस १०० रोपे भेट दिली होती,असे सांगून डॉ.कांबळे यांनी
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष इंजि. विकास देशपांडे यांचा सत्कार केला.

रोटरी क्लबचे अध्यक्ष इंजि. विकास देशपांडे यांनी वृक्षारोपण ही काळाची गरज असुन प्रत्येक विद्यार्थ्यांने किमान एक झाड दत्तक घेवून त्याचे संगोपन करण्याची पूर्ण जबाबदारी घ्यावी,असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपणात सहभाग नोंदवल्याबद्दल रो.प्रा.राजेंद्र ठोंबरे यानी विद्यार्थी वर्गाचे कौतुक करुन लावलेल्या वृक्षाचे संगोपन व संवर्धन करण्याचे आवाहन केले.रो.अरविंद डोंबे गुरुजी यांनी बडबड गीत सादर करुन मुलांना उपक्रमात सहभागी करुन घेतले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक गायकवाड यांनी केले.यावेळी,सचिव रो.इंजि.विलास बिले,रो.इंजि.अशोक गोडसे,अरविंद केदार आदि उपस्थित होते.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button