सांगोला :
सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त सदानंद मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका खास समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारांचे वितरण मोठ्या थाटामाटात व उत्साहात नुकतेच संपन्न झाले.
आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी डॉ.महादेव संभाजी गायकवाड (लोणविरे) यांना ‘सृजनशील शेतकरी पुरस्कार’,विजय रामचंद्र चव्हाण सांगलीकर (सांगोला) यांना ‘समाजसेवा प्रेरणा पुरस्कार’,श्रीमती साधना श्रीगणेश कुलकर्णी (सांगोला) यांना ‘कृतिशील आदर्श माता पुरस्कार’,श्रीमती जानकाबाई दिगंबर चंदनशिवे (अजनाळे) यांना ‘सार्थ स्वाभिमान पुरस्कार’ तर,वाढेगाव येथील मांगणगा भ्रमणसेवा बहूउद्देशीय संस्था यांना ‘आदर्श संस्था पुरस्कार’ आपुलकीच्या ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आपुलकीच्या सहभागी सदस्यांनी कराओके गीत,वैयक्तिक नृत्य,बौद्धिक खेळ सादर केले.त्यानंतर पुरस्कार वितरण व आपुलकी सदस्यांच्या विविध क्षेत्रातील निवडी,यश याबद्दल सन्मान करण्यात आला.यावेळी सांगोला येथील ज्येष्ठ नागरिक व परीट समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव जाधव यांनी आपल्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानला २ हजार ८६ रुपयाची देणगी दिली.शेवटी,कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपुलकीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
——————————————————————————
More Stories
आपुलकी प्रतिष्ठानचा गुंफण सामाजिक पुरस्काराने गौरव
स्व.आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या जयंती निमीत्त बुधवारी जवळा येथे समाधी दर्शन सोहळा
कर्करोग तपासणी व जनजागृतीसाठी सांगोल्यात रोटरी क्लबने काढली रॅली