महत्वाच्या बातम्या

खा.सुप्रियाताई सुळे यांच्याकडून साळुंखे-पाटील कुटुंबीयांचे सांत्वन

सांगोला : 

सांगोला तालुक्याच्या अध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक जडणघडणीत उल्लेखनीय योगदान असणाऱ्या ह.भ.प.शारदादेवी साळुंखे-पाटील तथा काकी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या कन्या व बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी साळुंखे-पाटील कुटुंबियांची भेट घेऊन स्वर्गीय काकींच्या आठवणींना उजाळा दिला आणि  साळुंखे-पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम.दिपकआबा साळुंखे-पाटील,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा माजी जि.प.अध्यक्षा जयमालाताई गायकवाड,सेवानिवृत्त डे.इंजि.महादेव गायकवाड,चारुशीलाताई काटकर,रुपमती साळुंखे-पाटील, डॉ.निलेश काटकर,माधुरी गायकवाड आदींसह साळुंखे- पाटील कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा.सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, स्व.काकीनी नेहमीच आपल्यावर एक कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम केले. सांगोला तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय प्रश्नावर त्या नेहमी साहेबांना भेटायच्या त्यावेळी, बऱ्याचदा काकींचा सहवास लाभला. सांगोला तालुक्यातील विकास कामाबाबत त्या नेहमी दक्ष असायच्या, प्रलंबित कामांचा पाठपुरावा करुन ती कामे पूर्ण करण्यावर काकींचा नेहमी भर होता. राजकीय व सामाजिक जीवनातील काकींचा वावर हा नेहमीच आपल्यासाठी प्रेरणादायक राहिला आहे. गेली अनेक वर्षांपासून साळुंखे-पाटील कुटुंबीयांचे पवार परिवाराशी असलेले नाते हे अतिशय दृढ आणि मजबूत आहे. त्याची पायाभरणी स्व.काकासाहेब साळुंखे-पाटील व ह.भ.प. शारदादेवी साळुंखे-पाटील तथा काकीसाहेब यांनी केली असून काकींची उणीव कधीच भरुन निघणार नाही. काकींनी घालून दिलेल्या आदर्श विचारावर भाविष्यात वाटचाल करु, असेही शेवटी खा.सुप्रियाताई सुळे यांनी आवर्जून नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button