महत्वाच्या बातम्या

मुंबई अग्निशमन दलातील सांगोल्याचा शूरवीर संतोष इंगोले यांना ‘राष्ट्रपती शौर्य पदक’

माजी आमदार दीपकआबा यांच्या हस्ते गौरव

माजी आमदार दीपकआबा यांच्या हस्ते गौरव

सांगोला :

सांगोला तालुक्यातील बामणी गावचे सुपुत्र व मुंबई अग्निशमन दलातील गोरेगाव अग्निशमन केंद्र येथे वरिष्ठ केंद्र अधिकारी म्हणून कार्यरत असलेले संतोष रावसाहेब इंगोले यांना अग्नीविमोचन सेवेत केलेल्या शौर्यपूर्ण,अतुलनीय आणि धाडसी कामगिरीबद्दल भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाले आहे.ही अभिमानास्पद कामगिरी संपूर्ण सांगोला तालुक्यासाठी गौरवाची बाब असून इंगोले साहेबांच्या धाडसाचे संपूर्ण राज्यभर कौतुक होत आहे. जीवन-मरणाच्या प्रसंगी धोक्याची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचविणाऱ्या त्यांच्या शौर्याला राष्ट्रपतींकडून मिळालेला हा सन्मान खर्‍या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.या अभिमानाच्या क्षणी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी आपल्या संपर्क कार्यालयात संतोष इंगोले यांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार केला.

याप्रसंगी बोलताना दीपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले की,संतोष इंगोले यांनी संकटाच्या प्रसंगी दाखवलेले धाडस व सेवाभाव हे सर्वांसाठी प्रेरणादायी असून अशा शूरवीरांमुळे सांगोला तालुक्याचा कर्तृत्वाचा ठसा राज्यभर उमटत आहे.त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेत.
कार्यक्रमास सांगोला तालुक्यातील विविध मान्यवर, कार्यकर्ते व इंगोले साहेबांचे कुटुंबीय उपस्थित होते.
——————————————————————————

बामणी गावातील सुपुत्र व माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांचे पुतणे पै.सुनील साळुंखे यांनीही कांही वर्षांपूर्वी ‘हिंदकेसरी’ हा किताब मिळवून सांगोला तालुक्याचे नांव उज्वल केले होते.आज ते डी.वाय.एस.पी या पदावर कार्यरत आहेत आणि आता बामणी गावातीलच संतोष इंगोले यांना ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ मिळाल्यामुळे सांगोला तालुक्याच्या शिरपेचात दुसरा तुरा बसविण्याचे काम बामणी येथील सुपुत्रांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button