महत्वाच्या बातम्या

आर्या वैद्य मिस इंडिया आॅस्ट्रेलिया पुरस्काराने सन्मानित

सांगोल्याच्या कन्येचा आॅस्ट्रेलियात झेंडा

सांगोला :

आॅस्ट्रेलिया देशातील अतिशय प्रतिष्ठेचा व मानाचा असलेला “मिस इंडिया-आॅस्ट्रेलिया-२०२४” हा पुरस्कार आपल्या सोलापूरच्या आर्या वैद्य या कन्येने पटकावला असून या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आर्या वैद्य ही बालपणापासूनच आॅस्ट्रेलियातील सिडने येथे रहात असून सध्या इंजिनियर म्हणून आॅस्ट्रेलियात वास्तव्यास असलेले सोलापूरचे अमोल वैद्य यांची ती सुकन्या आहे.विशेष म्हणजे तिचे सांगोला कनेक्शन असून सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील सेवानिवृत्त शिक्षिका मिना ठोंबरे ऊर्फ प्रतिमा कुलकर्णी यांची कन्या अनुप्रीत कुलकर्णी-वैद्य यांची आर्या ही कन्या आहे.म्हणजेच,आर्या ही सांगोल्याची नात आहे.

आर्या वैद्य ही सध्या मेलबोर्न येथे उच्च शिक्षण घेत असुन पहिल्याच प्रयत्नात तिने हे उत्तुंग यश प्राप्त केल्याबद्दल तिचे सोलापूर व सांगोला शहरातील सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button