सामाजिक

सुवर्णपदक विजेती सोमती कोडग हिचा आपुलकीकडून सत्कार

सांगोला :

रिले रनिंग मध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या कु.सोमती कोडग हिचा आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने सांगोला येथे नुकताच सत्कार करण्यात आला.

सांगोला तालुक्यातील आलेगाव येथील रहिवाशी व सध्या नोकरी निमित्त पुण्यात स्थायिक असलेले रामचंद्र कोडग यांची कन्या कु. सोमती कोडग हिने ६८ व्या नॅशनल स्कूल गेम २०२४ मध्ये (१७ वर्षाखालील) स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे २५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये सोमती कोडग आणि महाराष्ट्र टीमने ४*४०० मीटर रिले रनिंग मध्ये सुवर्णपदक जिंकले.त्याबद्दल आपुलकी प्रतिष्ठान कडून सोमती कोडग हिचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. 

यावेळी सोमतीचे वडील रामचंद्र कोडग,आई सौ.विद्या कोडग,आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव,अजयकुमार बाबर,प्रा.राजेंद्र सूर्यवंशी,अरविंद डोंबे,अरविंद केदार, राहुल टकले,दीपक शिनगारे,चंद्रशेखर कवडे,दादा खडतरे,सोमनाथ माळी,महादेव दिवटे,सोमनाथ सपाटे,इंजि.संतोष भोसले,अच्युत फुले,रविंद्र कदम, निलकंठ लिंगे,अतुल वाघमोडे आदी उपस्थित होते.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button