महत्वाच्या बातम्या

सांगोला शहरातील अनधिकृत अतिक्रमणे सरसकट न काढल्यास १ मे ला उपोषण – सतीशभाऊ सावंत

 

सांगोला :

           सांगोला शहरातील सर्वच रस्त्यावर व शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने शहरात प्रत्येक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून सांगोला शहरातील नागरिकांना याचा हकनाहक त्रास होत आहे.गोरगरीब जनतेवर कांही प्रस्थापित राजकारणी सूडबुद्धीने अन्याय करीत असून ही अतिक्रमणे तात्काळ सरसकट काढून घेण्यासाठी माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले असून ही अतिक्रमणे तात्काळ सरसकट न काढल्यास महाराष्ट्र दिन व कामगार दिनादिवशी १ मे रोजी सांगोला येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी दिला आहे.

सांगोला शहरातील एखतपूर रोड, महुद रोड,चिंचोली रोड,अहिल्यादेवी होळकर चौक,अंबिका देवी मंदिरा समोरील परीसर,विद्यामंदीर प्रशाला तसेच जुनी  भाजी मंडई,नवी भाजी मंडई,महात्मा फुले चौक,शिवाजी महाराज चौक,आण्णाभाऊ साठे चौक,तहसील कार्यालया समोरील आवार,वाढेगाव नाका,कडलास नाका तसेच नगरपालिके समोरील स्टेशन रोड,मिरज रोड पाण्याच्या टाकीपासून ते पंढरपूर रोड शहराच्या हद्दीपर्यंत न.पा.च्या जागेवर मोठ्या प्रमाणात टपर्‍या व दुकाने, हातगाडे यांनी अतिक्रमण केलेले आहे. व्यापार्‍यांनीही १०x१५ चे गाळे घेवून समोर पुन्हा १५ ते २० फुटाचे अतिक्रमण करुन शासकीय जागा लाटण्याचा प्रकार केलेला आहे. सदर टपर्‍या तात्काळ काढाव्यात. कांही मोजकीच अतिक्रमणे काढून प्रशासनाने गोरगरीबांवर अन्याय न करता सांगोला शहरातील सर्वच अनधिकृत अतिक्रमणे कोणताही दुजाभाव न करता सरसकट काढावीत. अन्यथा १ मे रोजी नागरिकांसह तहसील कार्यालया समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी दिला आहे.

—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button