सामाजिक

यावर्षीचा गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक साजरा करा – मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी

सांगोला :

गणेशोत्सव हा श्रद्धा,भक्ती व सामाजिक एकोप्याचा उत्सव असून या उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न आहे.सांगोला शहरात माझी वसुंधरा अभियान 7.0 अंतर्गत घरगुती गणेश मंडळे,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व नागरिकांनी यावर्षीचा गणेशोत्सव हा स्वच्छ पद्धतीने आणि पर्यावरणपूरक साजरा करावा,असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी केले आहे.

                   मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी पुढे म्हणाले की,गणेशमूर्ती शक्यतो शाडू मातीच्या व पर्यावरणपूरक असाव्यात तसेच प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता,गणेशोत्सवाच्या काळात निर्माण होणारा ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करुन निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करावा,गणेश विसर्जनासाठी नगरपरिषदेने निश्चित केलेल्या विसर्जन स्थळांचा वापर करावा.तसेच गणेश मंडळांनी स्वच्छता, पाणी बचत,वृक्षसंवर्धन,प्लास्टिकमुक्ती,ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धन याबाबत जनजागृती करणारे उपक्रम राबवावेत.मंडळांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखून नागरिकांनाही पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रोत्साहित करावे,असे आवाहनही त्यांनी केले आहे.                                             =========================

सांगोला शहर स्वच्छ,सुंदर व हरित करण्यासाठी सहकार्य करावे :

माझी वसुंधरा अभियान 7.0 अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुन स्वच्छ व सुंदर सांगोला घडवूया.“स्वच्छ सांगोला-सुंदर सांगोला” हा संदेश घेऊन सर्व नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा आदर्श निर्माण करुन सांगोला शहर अधिक स्वच्छ,सुंदर आणि हरित करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,              – मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी ==========================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button