महत्वाच्या बातम्या

कुलपती डॉ.पी.डी.पाटील यांचा सांगोल्यात झाला सत्कार

 

सांगोला :

पुणे येथील डॉ.डी वाय.पाटील इन्स्टिट्यूटच्या पिंपरी-चिंचवड विद्याशाखेचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील यांचा सांगोला येथील अजिंक्यतारा नागरी सहकारी पतसंस्थेत चेअरमन गिरीशभाऊ नष्टे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

         कुलपती डॉ.पी.डी.पाटील हे सांगोला पंचायत समितीचे तत्कालीन सभापती स्व.संभाजीराव (दादासाहेब) शेंडे यांचे भाचे असून १९६६-६७ या कालावधीत ते सांगोला येथील जि.प.प्राथमिक मुलांच्या शाळेत इ.७ वीत शिकत होते. सेवानिवृत्त मुख्य अभियंता प्रफुल्लचंद्र झपके,डॉ.पी.डी.पाटील व सांगोला शहरातील उद्योगपती तसेच अजिंक्यतारा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन गिरीशभाऊ नष्टे हे वर्गमित्र असून आजही चांगले मित्र आहेत.

सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथे डॉ.पी.डी.पाटील यांनी तेथील देवीच्या मंदिराचा जिर्णोध्दार आपली आई प्रभावती यांचे नावाने केला असुन मंदिराचे “प्रभावती लक्ष्मीदेवी मंदीर” असे नामकरण करण्यात आले आहे.या नामकरणप्रसंगी,डाॅ. पाटील हे सांगोला येथे आले असता,त्यांचे जुने मित्र गिरीशभाऊ नष्टे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.
याप्रसंगी,पतसंस्थेचे संचालक अँड.संजीव शिंदे,राहुल काशीद व इतर मान्यवर उपस्थित होते.
—————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button