लोणारी समाजाच्या एकजुटीच्या चळवळीमुळे अल्पावधीत न्याय मिळाला – आमदार शहाजीबापू पाटील

 

लोणारी समाजासाठी दिलेल्या योगदानामुळे आमदार शहाजीबापू पाटील यांचा लक्ष्मीनगरमध्ये नागरी सत्कार संपन्न—————————————————————

सांगोला :

लोणारी समाज बांधवांनी समाजाच्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी महाराष्ट्रभर एकजुटीने चळवळ उभी केली. उपोषण व चळवळीद्वारे लोणारी समाजाच्या अनेक मागण्या महायुती सरकारकडून मान्य झाल्या,हे या समाजाचे मोठे यश आहे.लोणारी समाजातील संतोष करांडे,दत्ता नरळे,बाबासाहेब खांडेकर,डॉ.सुदर्शन घेरडे यांनी सांगोला तालुक्यात उपोषण करुन राज्यभर चळवळ उभी केली.चळवळीच्या माध्यमातून सरकारकडे या मागण्या मान्य करण्यासाठी आम.शहाजीबापू पाटील,आम.गोपीचंद पडळकर,आम.जयकुमार गोरे आदी नेतेमंडळींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करुन मागण्या मंजूर करुन घेतल्या.यामध्ये सांगोला येथे नगरपालिका हद्दीमध्ये स्मारकासाठी जागा तसेच लोणारी समाजभवन उभा करण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी व लोणारी समाजासाठी लोणारी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले.या महामंडळाच्या स्थापनेचा जीआर ९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला.महाराष्ट्रात विष्णुपंत दादरे यांचे स्मारक प्रथम सांगोला तालुक्यात निर्माण करु.तसेच लोणारी समाजाला कोणत्याही बाबतीत अडचण येऊ देणार नाही,असे ठाम आश्वासन आमदार शहाजीबापू पाटील यांनी लक्ष्मीनगर (ता.सांगोला) येथे लोणारी समाज बांधवांना दिले.

            लोणारी समाजाने लोकप्रतिनिधीकडे व शासनदरबारी उपोषणाद्वारे मागण्यांचा पाठपुरावा करत सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी आग्रह धरला.लोणारी समाजाच्या अनेक मागण्या मान्य झाल्याने व आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याने आमदार शहाजीबापू पाटील यांचा बुधवारी लक्ष्मीनगर येथे नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी आम.शहाजीबापू पाटील हे बोलत होते.यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की,लोणारी समाजाला अल्पावधीतच सरकारने न्याय दिला. सर्व पक्षातील लोणारी समाज बांधवांचे प्रेम माझ्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देऊ.त्यासाठी आपल्या ध्येयाची वाटचाल कधीही थांबता कामा नये.राजकारणात विजय व पराजय हा होतच असतो. त्यामध्ये खचून न जाता आपली वाटचाल पुढे चालू ठेवावी लागते. लक्ष्मीनगरला टेंभू योजनेचे पाणी मिळणार असून या ठिकाणी हरितक्रांती होणार आहे.लोणारी समाजाला मिळालेले यश हे ऐतिहासिक असून या समाजाबरोबर इतर समाजालाही शासनाने न्याय दिला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कौटुंबिक जीवनात गरिबी अनुभवल्याने त्यांना गरिबीची जाणीव असून अनेक समाजाच्या मागण्या त्यांनी चुटकीसरशी सोडविल्या आहेत.मुख्यमंत्र्यांच्या जलद निर्णयामुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यात यश आले.या समाजाने अनेकवेळा मोठी मदत केली आहे,हे विसरुन चालणार नाही. स्व.बाबासाहेब करांडे यांना समाजाविषयी तळमळ होती. लोणारी समाजातील उपोषण कर्त्यांनी क्रांती करुन समाजाला न्याय मिळवून दिला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २ कोटी रुपये निधी दिला असून भविष्यात आणखी निधी मिळेल,असे अपेक्षित आहे.या समाजाच्या विकासासाठी कोणतीच अडचण येऊ देणार नाही,असे आश्वासन आमदार शहाजीबापू पाटील यांनी लक्ष्मीनगर येथे दिले.

   यावेळी आमदार शहाजीबापू पाटील व लोणारी समाजातील, उपोषणकर्ते तालुकाध्यक्ष संतोष करांडे,तालुका सचिव दत्ता नरळे,तालुका संघटक बाबासाहेब खांडेकर,लोणारी महासंघाचे सुदर्शन घेरडे या उपोषणकर्त्यांचा सन्मान सोहळा लक्ष्मीनगर येथे लोणारी समाज बांधवांच्या वतीने आयोजित केला होता. रथातून मिरवणूक काढण्यात येवून आमदार शहाजीबापू पाटील व उपोषणकर्ते यांचा एकत्रित सत्कार करण्यात आला.प्रथम मान्यवरांच्या हस्ते लोणारी समाजाचे नेते विष्णुपंत दादरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक सिद्धेश्वर हिप्परकर यांनी केले.तसेच सागरदादा गोडसे, बाबासाहेब खांडेकर,दत्ता नरळे,संतोष करांडे,सुदर्शन घेरडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

लोणारी समाज हा सर्व क्षेत्रात काम करत आहे.या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी,उपोषणकर्त्यांचा त्याग महत्त्वाचा ठरला आहे.खऱ्या अर्थाने आमदार शहाजीबापू पाटील यांनी लोणारी समाजाला न्याय दिला.भविष्यात विष्णुपंत दादरे स्मारक सांगोल्यात निर्माण करण्यासाठी व इतर कामासाठी शहाजीबापू पाटील यांनी सहकार्य करु,असे सांगितले. तालुक्यात ४५ गावांमध्ये लोणारी समाजाचे वास्तव्य आहे. समाजासाठी समाजभवन वसतिगृह,ग्रंथालय,स्मारक व्हावे, अशा स्वरुपाच्या मागण्या आहेत.लोणारी समाजाच्या मागण्यांचा जीआर निघाल्याने लोणारी समाजातून उत्साहाचे वातावरण आहे.स्व.बाबासाहेब करांडे यांनी लोणारी समाजाच्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली असून ही चळवळ पुढे नेण्याचे काम लोणारी समाज बांधवांनी केले.

   यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे म्हणाले की, लोणारी या बहुजन समाजाने क्रांतिकारक चळवळ उभी केली. समाजातील कार्यकर्त्यांनी ६ दिवस उपोषण करुन ताकद उभी केली. गोरगरिबांना न्याय देणारा आमदार म्हणून शहाजीबापू पाटील यांचा उल्लेख केला जातो.कार्यक्रमासाठी सागर गोडसे, परमेश्वर नरळे,धनंजय नरळे,सुरेश कदम,गोरख निमगरे, डी.बी. नरळे,महादेव गोडसे,दीपक ऐवळे,संजय मेटकरी,चंद्रकांत बजबळकर,अनिल नवत्रे,दादासाहेब घेरडे,सिद्धेश्वर हिप्परकर, विनायक काळेल,दीपक बाड,अशोक नरळे,सोमनाथ बाड, प्रमोद हुबाले,दत्ता बाड यांच्यासह लोणारी समाजातील मान्यवर व लोणारी समाज बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————————