महत्वाच्या बातम्या

ग्राहकांना उत्तम सेवा पुरवून हॉटेल ए-वन सात-बारा आपला नावलौकीक वाढवेल  – आ.जयंत पाटील

 

 

सांगोला :

           सांगोला परिसरातील तसेच सोलापूर-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरुन येणार्‍या-जाणार्‍या लोकांना हॉटेल ए-वन सात-बारा हे उत्तम सेवा पुरवून आपला नावलौकीक निश्चीतच वाढवेल,असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी हाॅटेलच्या उदघाटनप्रसंगी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मिरज तालुका विधानसभा क्षेत्राचे युवक अध्यक्ष महादेव सांवत यांनी सांगोला- मिरज रोडवर सूतगिरणी जवळ नव्याने सुरु केलेल्या हॉटेल ए-वन सात-बारा या हॉटेलचा उदघाटन समारंभ आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते नुकताच मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.यावेळी आ.जयंत पाटील हे बोलत होते. यासमयी व्यासपीठावर माजी आम. दिपकआबा साळुंखे-पाटील, मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मनोज शिंदे (म्हैसाळकर), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले की, सांगोला सारख्या ग्रामीण भागातील एका शेतकर्‍याचा मुलगा कष्टाने कसा मोठा उद्योगपती होऊ शकतो, याचे एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे महादेव सावंत आहेत.अनेक नवीन तरुण युवकांनी महादेव सावंत यांच्याप्रमाणे कष्ट केल्यास शंभर टक्के यश प्राप्त होते,हेच त्यांनी दाखवून दिले आहे. युवक मंडळींनी हताश न होता किंवा नोकरीच्या मागे न लागता,व्यवसाय करून कष्टाने व जिद्दीने उद्योगपती बनण्याचे स्वप्न पाहण्यास काही हरकत नाही,अशी आशा माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी महादेव सावंत यांनी आ.जयंत पाटील यांचा संत तुकाराम महाराज यांची पगडी,विठुरायाचा तुळशीचा हार, वीणा व शक्तीभक्तीची प्रतिमा देवून सत्कार केला. उदघाटन समारंभास राष्ट्रवादीचे सांगलीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे सांगलीचे युवक जिल्हा अध्यक्ष विराज नाईक,बाबुराव गायकवाड,तानाजीकाका पाटील, माजी नगरसेवक शिवाजी बनकर, मधुकर बनसोडे, अनिल खटकाळे, संदिप फडतरे,डॉ.बाबासाहेब बंडगर, डॉ.पियुष साळुंखे-पाटील,ज्ञानेश्वर गायकवाड,संजय पाटील, रामचंद्र दत्तू,पै.प्रकाश गंगथडे,पै.समाधान अंभगराव, पै. माऊली काळे,पै.भिमराव शिंदे,सत्यजीत सुरवसे, मनोज बाबा शिंदे,अविनाश पाटील, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
सर्वांचे स्वागत महादेव सावंत व जयसिंग पवार यांनी केले. तर आभार महादेव सावंत यांनी मानले. सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगोला-मिरज येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button