महत्वाच्या बातम्या

नीरा-देवधरच्या पाण्यातून सांगोला- पंढरपूर मतदार संघासाठी १ टीएमसी वाढीव पाणी मंजूर – ॲड.शहाजीबापू पाटील

सांगोला-पंढरपूर मतदार संघातील नीरा-देवधरचा कॅनॉल होणार बारमाही

सांगोला :

नीरा-देवधर योजनेतून सांगोला पंढरपूर मतदार संघासाठी १ टीएमसी वाढीव पाणी मंजूर करण्याचा निर्णय बुधवारी १६ एप्रिल २०२५ रोजी मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतल्याची माहिती माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

सदर बैठकीस सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर,आमदार बाबासाहेब देशमुख,माजी आमदार शहाजीबापू पाटील,जलसंपदा सचिव दीपक कपूर,कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

             माजी आमदार शहाजीबापू पाटील व आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीवरुन धरण क्षेत्रातून बंदिस्त पाईपलाईन करुन मैल क्र.९५ येथे १ टीएमसी पाणी थेट कॅनॉलमध्ये सोडण्याचा निर्णय होऊन तातडीने याचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या असल्याची माहिती माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

लवकरच या कामास सुरुवात केली जाणार असून त्यामुळे सांगोला व पंढरपूर मतदारसंघात निरा उजवा कालवा हा बारमाही होणार असल्याने लाभक्षेत्रातील सर्व गावांना याचा खूप मोठा फायदा होणार असल्याचे शहाजीबापू पाटील यांनी यावेळी सांगीतले.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button