महत्वाच्या बातम्या

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त सांगोल्यात चैतन्य हास्य योग मंडळातर्फे अभिवादन

 

सांगोला :

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमीत्त सांगोला शहरातील चैतन्य हास्य योग मंडळातर्फे डाॅ.बाबासाहेब यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन शुक्रवारी सकाळी त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.कृष्णा इंगोले हे डाॅ.बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा व विद्वत्तेचा गौरव करताना म्हणाले की,कर्मवीर भाऊराव पाटील,संत गाडगे बाबा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे गेल्या शतकातील तीन लोकोत्तर व समकालीन युगपुरुष असून डाॅ.बाबासाहेब यांच्या इतका प्रचंड विद्वान,ज्ञानी व अभ्यासू युगपुरुष पाहिला नसल्याचे सांगून गौतमबुद्ध,महात्मा फुले व डाॅ. बाबासाहेब यांच्या विचारांचे विवेचन केले.

यावेळी, झिरपे सर यांनी डाॅ.बाबासाहेबांनी गोरगरीब व वंचित घटकांना दिलेल्या योगदानाची आठवण करुन दिली. विशेष म्हणजे, गेली वीस वर्षांहून अधिक काळ सदर चैतन्य हास्य योग मंडळाचे कार्य हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानातच बाबासाहेबांच्या कृपाछत्राखाली व आशिर्वादाने सुरु असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी नोंदवले. याप्रसंगी,प्रा.उत्तम घाटुळे,म.शं.घोंगडे सर,प्रा.राजेंद्र ठोंबरे,भागवत पैलवान गुरुजी,सुभाष महीमकर सर,ह.भ.प. बाळासाहेब तेली,उत्तम पाटोळे,सुधीर दौंडे,बाबुराव लाड, अशोक जाधव आदी उपस्थित होते.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button