शैक्षणिक

परमेश्वर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवल्या आकर्षक पणत्या

 

सांगोला :

कामती खुर्द येथील लमाणतांडा परिसरातील श्री परमेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या तोंडावर अतिशय सुंदर व आकर्षक अशा पणत्या बनविल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात तो एक चर्चेचा विषय ठरला असून या शाळेतील विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. 

दिवाळीचा सण तोंडावर आला असून त्या पार्श्वभूमीवर, दिव्यांचा झगमगाट करणार्‍या दिवाळीत पणत्यांनाही तेवढेच महत्व असते. विद्यार्थ्यांना पणत्या बनविण्याची कला अवगत व्हावी,या उद्देशाने कामती खुर्द येथील लमाणतांडा परिसरातील श्री परमेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या शाळेतील कला शिक्षक सुरेश मलाव यांनी विद्यार्थ्यांना पणती तयार करण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले आणि त्यानुसार, विद्यार्थ्यांनीही अगदी उत्साहाच्या भरात अत्यंत सुंदर व आकर्षक अशा पणत्या बनवून एकप्रकारचा आनंद लुटला.

या नाविण्यपूर्ण उपक्रमास ज्ञानेश्वर अंकुशराव यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनीही योगदान दिले. सदर उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक जब्बार शेख यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना शाबासकी देवून त्यांचे कौतुक केले.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button