स्पंदन हॉस्पिटलमधील तातडीच्या उपचारामुळे,वृध्दाला मिळाले जीवदान

सांगोला :
एका ६५ वर्षीय वृध्द इसमास मध्यरात्री अचानकपणे श्वसनाचा अतित्रास होवू लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सांगोला येथील “स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” मध्ये आणले. रुग्णाची अवस्था पाहून या हाॅस्पिटलमधील डॉक्टर व स्टाफने तत्परता दाखवून तात्काळ व्हेन्टीलेटरची सुविधा उपलब्ध करुन दिली आणि आवश्यकतेनुसार योग्य तो औषधोपचार केल्याने,या वृध्दाला जीवदान मिळाल्याची घटना नुकतीच सांगोला येथे घडली असून रुग्णाचा जीव वाचल्याने संबंधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी स्पंदन हॉस्पिटलमधील डाॅक्टर्स व स्टाफचे मनापासून आभार मानले आहेत.
मध्यरात्री १२.३० चे सुमारास एका ६५ वर्षीय वयोवृद्ध रुग्णास अचानकपणे श्वसनाचा त्रास सुरु झाला, खूप दम लागत होता, त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सांगोला येथील स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आणले. अत्यवस्थ अवस्थेतील रुग्णाचा त्रास पाहून हॉस्पिटलमधील ऑनड्युटी डॉक्टर व स्टाफने त्यांना कॅज्युएलिटीमध्ये घेवून रुग्णाचा बी.पी.,पल्स व शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासले असता,बी.पी.लागत नव्हता, ऑक्सिजनचे प्रमाणही फक्त २० टक्केच होते. त्यामुळे, रुग्णाला तातडीने ऑक्सिजन लावण्यात आला आणि पेशंटचा ECG काढला असता, ECG मध्ये बदल असल्याचे डॉक्टरांना जाणवले.त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने डॉ.अतुल बोराडे यांचेशी संपर्क साधला आणि रुग्णाच्या इमर्जन्सीची माहिती दिली. डॉ.बोराडे यांनी तेथील डॉक्टरांना कांही सूचना देवून रुग्णाला आयसीयू मध्ये दाखल करण्यास सांगितले व तात्काळ हाॅस्पिटलकडे धाव घेतली. डाॅ.अतुल बोराडेंनी रुग्णाला तपासून रुग्णाला श्वास घेण्यास अतिशय त्रास होत असल्याचे जाणवल्याने व इसीजी मध्येही हार्टअटॅकची लक्षणे दिसून आल्याने आणि हळुहळू सदर रुग्ण कार्डियाक अरेस्टमध्ये गेल्याने रुग्णाला CPR देवून तसेच त्याला रेसक्सिनेट करुन इमर्जन्सी इंट्युबेशन करण्याचा निर्णय घेतला आणि रुग्णाला व्हेंटिलेटरचाही सपोर्ट देण्यात आला. ईमर्जन्सी पाहून कृत्रिम श्वास देण्याचा घेतलेला निर्णय आणि लावलेले व्हेंटिलेटर तसेच योग्यवेळी केलेले तातडीचे उपचार यामुळे सदर रुग्णाला जीवदान देण्यात स्पंदन हॉस्पिटलमधील टीमला यश आले. त्यानंतर केलेले उपचार आणि रुग्णाच्या शरीरानेही दिलेली साथ यामुळे तिसऱ्या दिवशी रुग्णाला लावलेला व्हेंटिलेटर काढण्यात आला.
योग्य त्या औषधोपचारामुळे जीवदान मिळाल्याने हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेत असताना रुग्ण व नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते.”स्पंदनच्या डॉक्टरांनी व सर्व स्टाफने वेळीच अचूक व योग्य निदान करुन आणि योग्य निर्णय घेवून औषधोपचार केल्यामुळे “काळ आला होता पण, वेळ आली नव्हती” म्हणून आज आम्ही आमचा पेशंट घरी घेऊन जात असल्याची भावनिक प्रतिक्रिया रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी यावेळी व्यक्त केली. डाॅ.अतुल बोराडे आणि सर्व स्टाफच्या प्रयत्नांमुळे आमच्या पेशंटचा जीव वाचला असून या सर्वांचे आभार मानावे तेवढे
थोडेच आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सांगोला वेल्फेअर असोसिएटचा दुसरा वर्धापन दिन असल्यामुळे सदर पेशंटला डिस्चार्ज देण्यापूर्वी या पेशंटच्या हस्तेच केक कापून हा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यासमयी, डॉ.शैलेश डोंबे, डॉ.किरण जगताप, डॉ.वैभव जांगळे,डॉ. योगेश बाबर,डॉ.राहुल इंगोले, डॉ.प्रतीक्षा खांडेकर, डॉ.प्रद्युम्न कुलकर्णी,विनायक लोखंडे तसेच हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ उपस्थित होता.
**********************************************
स्पंदन हाॅस्पिटलमध्ये अत्याधुनिक व उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्नशील :
सांगोला येथील “स्पंदन हॉस्पिटल” हे गेल्या दोन वर्षापासून रुग्णांना तातडीची इमर्जन्सी सेवा देण्यात अग्रेसर ठरले असून सर्व सोईसुविधांनी युक्त असे हे पूर्णपणे सुसज्ज हाॅस्पिटल आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी व आरोग्यासाठी हे हॉस्पिटल कटिबद्ध आहे. इथून पुढील काळात स्पंदन हाॅस्पिटलमध्ये अत्याधुनिक व अधिक उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी मी व माझी टीम प्रयत्नशील आणि कटिबद्ध असून यापुढे सांगोला शहर व तालुक्यातील रुग्णांना इमर्जन्सीच्या कारणावरुन मोठ्या शहरात धाव घेण्याची आवश्यकता भासणार नाही,अशी रुग्णसेवा स्पंदन हाॅस्पिटलमध्येच देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील.
– डॉ.पियुष साळुंखे-पाटील
(मॅनेजमेंट & एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट)
**********************************************
उपचारावेळी नातेवाईकांचे सहकार्य आवश्यक :
रुग्णाचा त्रास लक्षात घेवून रुग्णाला ईमर्जन्सी आहे, हे पेशंटच्या नातेवाईकांना कळले पाहिजे आणि त्यानुसार,नातेवाईकांनी तातडीने उपचार करण्यास परवानगी दिली पाहिजे. रात्री या पेशंटला दवाखान्यात आणल्यानंतर निर्णय घेण्यामध्ये नातेवाईकांनी जर वेळ लावला असता तर, आज तो पेशंट इथे दिसला नसता.
इथून पुढच्या काळात स्पंदनमध्ये अधिकाधिक चांगली सुविधा उपलब्ध करुन देऊ तरीदेखील, उपचार करताना नातेवाईकांचे सहकार्य असणे ही आवश्यक बाब आहे.
– डॉ.अतुल बोराडे **********************************************