रयत शिक्षण संस्थेवर निवड झाल्याबद्दल दिपकआबांचा कोळा येथे होणार नागरी सत्कार

सांगोला :
सामान्य लोकांच्या हितासाठी नेहमीच अहोरात्र झटणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांची पेट्रोनमधून रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून रयत सारख्या लोकप्रिय शिक्षण संस्थेत आपल्या हक्काचा माणूस नियुक्त झाल्याबद्दल सांगोला तालुक्यातील कोळा येथे रविवारी ५ मार्च रोजी सायं.५ वा.सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने दिपकआबांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
संपूर्ण कोळा आणि तालुक्याचे शक्तीपीठ असलेल्या १०८ श्री.श्री. श्री.रुद्रपशुपती कोळेकर महास्वामी यांच्याहस्ते माजी आमदार दिपक आबा साळुंखे-पाटील यांचा हा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून या सत्कार समारंभास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला अध्यक्षा स्वातीताई शिंदे-पवार व महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक संघाचे सल्लागार लहू कांबळे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या नागरी सत्कार समारंभास कोळा आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
—————————————————————————