महत्वाच्या बातम्या

उजनीच्या पाण्याची पळवापळवी रोखण्यासाठी आता शेतकर्‍यांनीच पुढाकार घेणे आवश्यक – आ.रणजितसिंह मोहिते-पाटील

वर्षभरात ७ टीएमसी मराठवाड्यात तर,२ टीएमसी पाणी जाणार घाटणे बंधाऱ्यात

वर्षभरात ७ टीएमसी मराठवाड्यात तर,२ टीएमसी पाणी जाणार घाटणे बंधाऱ्यात

सांगोला :

उजनी धरणाच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यासह आसपासच्या विवीध जिल्ह्यांतील सुमारे १०० हून अधिक गावांच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून असून भरीत भर म्हणून आता पुन्हा नव्याने कांही पाणीपुरवठा योजनांसाठी उजनीतील पाण्याची तरतूद केली जात असल्याने उजनीच्या पाण्याची पळवापळवी रोखण्यासाठी आता शेतकर्‍यांनीच पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले आहे.

                                आगामी काळात मराठवाड्यासह
इतर कांही भागासाठी उजनीतील पाण्याची तरतूद केली जात असल्याने भीमा नदीला व कालव्याला पाणी सोडण्यासाठी मर्यादा येणार असून या पार्श्वभूमीवर विचार विनीमय करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कामती येथे नुकत्याच पार पडलेल्या उजनी लाभक्षेत्रातील मोहोळ व मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बैठकीत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पाणी नियोजनासाठी आता यापुढे शेतकऱ्यांनीच पुढाकार घेण्याबाबत आवाहन केले.

सदर बैठकीदरम्यान,जेष्ठ नेते वसंतनाना देशमुख, मनोहर भाऊ डोंगरे,बाबासाहेब क्षिरसागर,माजी उपसभापती मानाजीबापू माने,अनिल सावंत, राजशेखर पाटील,अस्लम चौधरी,विनय पाटील,दीपक गायकवाड,सीमाताई पाटील,कामतीचे सरपंच प्रवीण भोसले,डॉ.सर्वळे,अच्युत पाटील,रणजीत चवरे, ॲड.पवन गायकवाड,विजय कोकाटे,विजय बुरकुल, शिवशंकर कावचळे,भारत पाटील,काशीनाथ पाटील यांचेसह इतर मान्यवर व शेतकरी बांधव उपस्थित होते.
——————————————————————————

वर्षभरात ७ टीएमसी मराठवाड्यात तर,२ टीएमसी पाणी जाणार घाटणे बंधाऱ्यात-

आगामी वर्षभरात उजनीतील सुमारे ७ टीएमसी पाणी मराठवाड्यात जाणार असून या डिसेंबर अखेरीस २ टीएमसी पाणी हे घाटणे बंधाऱ्यात सोडले जाणार असल्याने उजनीच्या पाण्याचा तुटवडा वरचे वर वाढत जाणार आहे.तसेच सोलापूर शहरासाठी असलेल्या समांतर जलवाहिनीचे कामही पूर्ण झाले असल्याने भीमा नदीला आणि कालव्याला पाणी सोडण्यासाठी मर्यादा येणार आहेत,त्यासाठी पाण्याची पळवापळवी रोखण्यासाठी उजनीचे पाणी शेतकऱ्यांनी आरक्षित करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त पाणीवापर संस्थांची नोंदणी करणे काळाची गरज आहे.       – आ.रणजितसिंह मोहिते-पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button