मुंबई :
तिरुपती येथे दर्शनासाठी गेलेल्या सोलापूर येथील भाविकांच्या वाहनाला बुधवारी अपघात झाल्याने त्यात सोलापूर येथील ५ तरुणांचा मृत्यू झाला आणि ४ जण जखमी झाले. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत आणि या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे तर,जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
सोलापूर येथून तिरुपती येथे दर्शनासाठी गेलेल्या तरुणांच्या वाहनाला काल तिरुपतीजवळ अपघात झाला. त्यातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले असल्याने त्यांच्यावर तिरुपती देवस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमींच्या उपचाराबाबत सोलापूर प्रशासनाला निर्देश दिले असून मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
—————————————————————————
More Stories
प्रलंबित तांत्रिक वेतनश्रेणीसाठी भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
एलसीबीच्या ख्वाॅजा मुजावरना मिळाली बढती अन् बनले फौजदार
देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिल्लावळ सोलापुरात घडविणार होती दंगल – खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप