पंतप्रधान मोदी यांचेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या आ.अमोल मिटकरींच्या विरोधात सोलापूरात तक्रार दाखल
सोलापूर :
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दि.९ डिसेंबर रोजी सोलापूर येथील एका सभेस उद्देशून बोलताना,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने हेतूपुरस्सर “मोदी हे चोर आहेत, त्यांनी अमीन सयानी यांचे शब्द चोरलेले आहेत” अशा शब्दात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बाबत आक्षेपार्ह विधान करत अमोल मिटकरी यांनी जनतेचा प्रतिनिधी असल्याचे भान न ठेवता,सामाजिक भावना चेतवण्याचे दष्टीने जाणून बुजून समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे,मिटकरींच्या या वक्तव्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असल्याने,अमोल मिटकरी यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम १५३ अ,५००,५०५ (२) प्रमाणे गुन्हा नोंदवून योग्य ती कारवाई व्हावी,अशी तक्रार भाजपचे चिटणीस अनिल रेवणसिद्ध कंदलगी यांनी सोलापूर सदर बाझार पोलीस स्टेशन येथे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शहर अध्यक्ष विक्रम देशमुख,उपाध्यक्ष विजया वड्डेपल्ली, चिटणीस अनिल कंदलगी,चिटणीस नागेश,सरगम मंडळ अध्यक्ष सुनील गौडगाव,सोशल मीडिया संयोजक योगेश गिराम,युवा मोर्चा अध्यक्ष गणेश साखरे,प्रेम भोगडे,ओबीसी मोर्चा अध्यक्ष राम वाघसे,एससी मोर्चा अध्यक्ष बाबुराव संगेपांग व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
—————————————————————————