बोधी फाउंडेशनचा जीवन गौरव पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार सुनील पोपळे यांना जाहीर
औरंगाबाद :
पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी एनजीओ बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील पत्रकारांना दिला जाणारा “जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार” यंदा साप्ताहिक ‘प्रकाश आधार’ चे संपादक सुनील पोपळे यांना जाहीर करण्यात आला आहे.
एनजीओ बी.टी.ई.फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांना दिले जाणारे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले असून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या राज्यातील पत्रकारांना राज्यस्तरीय ’जीवन गौरव’ पुरस्काराने ऐतिहासिक औरंगाबाद शहरात लवकरच होणार्या कार्यक्रमात प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप उत्कृष्ट सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, मानाचा फेटा, पुष्पगुच्छ असे सर्व पुरस्कारांचे स्वरुप आहे.
जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी :
* मराठी – राज्यस्तर *
1) सुनील पोपळे (संपादक-साप्ताहिक प्रकाश आधार, गेवराई,बीड) 2) शांतीलाल गायकवाड (दैनिक लोकमत, औरंगाबाद) 3) विनोद शंकरराव काकडे (दैनिक पुढारी, औरंगाबाद) 4) प्रा.पंजाबराव गोविंदराव मोरे (दैनिक सामना,संभाजीनगर) 5) अनिलकुमार रामराव जमधडे दैनिक सकाळ,औरंगाबाद) 6) अमित सुभाषचंद्र फुटाणे (ई टीव्ही,औरंगाबाद) 7) प्रवीण बबनराव बुरांडे (दैनिक जनपत्र,औरंगाबाद) 8) कल्याण प्रभाकरराव अन्नपूर्णे (दैनिक वृत्त टाइम्स,औरंगाबाद) 9) उज्वला साळुंके (दैनिक सांजवार्ता,औरंगाबाद) 10) विद्या गावंडे (दै.दिव्य मराठी, औरंगाबाद.11) अरुण सुरडकर, दैनिक सामपत्र औरंगाबाद) 12) संजय हिंगोलीकर (दैनिक लोकप्रश्न, औरंगाबाद) 13) अँड.संदीप श्रीराम बेदरे (दैनिक मराठवाडा साथी,बीड) 14) अनिल किसन गायकवाड (दैनिक लोकमत,बीड) 15) रफिक घाची (दैनिक डहाणू मित्र,पालघर) 16) शाहू संभाजी भारती (दैनिक रयतेचा कैवारी,पालघर) 17) अब्दुल कय्यूम अब्दुल रशीद (साप्ताहिक औरंगाबाद युवा) यांचा या पुरस्कारामध्ये समावेश आहे. राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार निवडीचे पत्र एनजीओ बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष रामदास वाघमारे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.