उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचे गौरवशाली कार्य समाजासाठी भूषणावह – पो.नि.विनोद घुगे

 ५१७ रक्तदाते व हजारो मित्रपरिवारांच्या उपस्थितीत वाढदिवस कार्यक्रम संपन्न

सांगोला :

विविध प्रकारच्या आर्थिक संस्था त्याचबरोबर अनेक प्रकारचे उद्योग उभे करत मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारे उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचे विविध क्षेत्रातील गौरवशाली कार्य राष्ट्रासाठी आणि समाजासाठी अत्यंत भूषणावर असल्याचे गौरवोदगार सांगोला पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी व्यक्त केले.

सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक आणि एलकेपी मल्टीस्टेटचे चेअरमन उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवस कार्यक्रमा निमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सूर्योदय परिवाराने जोपासलेल्या १००१ झाडांबद्दल विशेष कौतुक करत सूर्योदयच्या सर्वच सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. वाढदिवसानिमित्त ‘रेवनील ब्लड बँकेच्या’ सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मंचावर डॉ.शिवराज भोसले,डॉ.विजयकुमार इंगवले,डॉ.संतोष पिसे,युवा नेते अजिंक्यराणा शिंदे, समीर पाटील,डॉ.बंडोपंत लवटे,सुभाष दिघे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सूर्योदय उद्योग समूहाचे सह संस्थापक जगन्नाथ भगत यांनी प्रास्ताविकामध्ये सूर्योदयाच्या विविध उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती सांगत उपस्थितांचे स्वागत केले.

सूर्योदय उद्योग समूह व एलकेपी मल्टीस्टेटच्या वतीने अनिलभाऊ इंगवले यांच्या सन्मानार्थ ३ ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  सोमवार दि.९ जून रोजी सांगली जिल्ह्यातील,जत तालुक्यामधील डफळापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये सुमारे ८२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मंगळवार दि.१० जून रोजी सोलापूर शहरांमध्ये एलकेपी मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यालयाजवळ आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये सोलापूर शहर आणि परिसरातील सुमारे ९१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.वाढदिवसा दिवशी सांगोला शहरातील सदानंद हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी अत्यंत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून एकूण सुमारे ५१७ रक्तदात्यांचे भरीव योगदान या निमित्ताने दिसून आले. वृक्षारोपणासारखे पर्यावरण पूरक उपक्रम,नेत्ररोग निदान शिबीर,स्त्री रोग निदान शिबीर,सर्व रोग निदान शिबीर,तीर्थयात्रा दर्शन, जलसंधारण आणि दुष्काळ निवारण कार्य,अन्नदान सेवा यासारख्या अनेक लोकोपयोगी सामाजिक उपक्रमा बरोबरच ‘रक्तदान शिबिराची’ सूर्योदय उद्योग समूहाची अनेक वर्षांची परंपरा असून दरवर्षी चढत्या क्रमाने रक्तदात्यांचा सहभाग वाढत आहे.वाढदिवस कार्यक्रमाचे निमित्ताने अनिलभाऊ यांनी सामाजिक कार्य करणाऱ्या ‘आपुलकी प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेला यावेळी रोख ११ हजार रुपयांची देणगी दिली.

दिवसभर चाललेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये सांगोला तालुका, जिल्हा तसेच राज्यभरामधून अनेक मान्यवरांनी दूरध्वनीवरुन तसेच उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.मंगळवेढ्याचे माजी सभापती तानाजी काकडे,लय भारी उद्योग समूहाचे प्रमोददादा साळुंखे, दामाजीचे संचालक बसवेश्वर पाटील,ब्रम्हा उद्योग समूहाचे मारुती माळी,सांगलीचे उद्योजक नानासाहेब पाटील,सुवर्णरत्नचे महादेव बिराजदार,शोभाश्री परिवाराचे किरण पुजारी,उद्योजक किरणभाऊ पांढरे, महादेव दिघे,संजय साळुंखे,प्रशांत पाटील,विठ्ठल मल्टीस्टेटचे दीपक बंदरे,डॉ.डी.बी इंगोले,अरविंद केदार,ऍड.सतीश लेंडवे इत्यादी मान्यवरांसह दिवसभरात हजारो मित्रपरिवारांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. वित्तीय संस्था त्याचबरोबर व्यवसाय आणि उद्योग समर्थपणे सांभाळत असताना सामाजिक भान ठेवून कायम सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सूर्योदय परिवाराबद्दल व संस्थापक अनिल इंगवले यांच्याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
——————————————————————————

सूर्योदयच्या दैदीप्यमान वाटचालीसाठी सहकार्य करणार्‍यांच्याप्रती केली कृतज्ञता व्यक्त :

ज्या समाजाच्या आधारावर आपण पुढे वाटचाल करतो,त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपण सतत कांहीतरी करत राहिले पाहिजे.ही सूर्योदयची परंपरा असल्याचे सांगत, सूर्योदय उद्योगसमुहाच्या दैदीप्यमान वाटचालीसाठी ज्या-ज्या घटकांचे सहकार्य लाभत आहे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
– उद्योजक अनिलभाऊ इंगवले