सांगोला :
सांगोला तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत कोरडा नदीत पाणी सोडण्यासाठी मागणीचे पत्र आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी कांही दिवसांपूर्वीच जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिले होते.आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला यश आले असून लवकरच कोरडा नदीत पाणी सुटणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सांगोला तालुक्यातील सुमारे ३० ते ३५ गावे यात येत असून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत सांगोला तालुक्यातील माण व कोरडा नदीवर १९ बंधाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या १९०० ते २००० हेक्टर जमिनीसाठी पाणीसाठा कमी क्षमतेने असल्याने सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी तात्काळ सोडल्याने माण व कोरडा नदीवर अवलंबून असणारे १९ बंधारे पूर्ण क्षमतेने भरणार असून शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रश्न याद्वारे तात्काळ मार्गी लागणार आहे.
आ.डाॅ.बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीनुसार सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत कोरडा नदीत सोडण्यात येणार असून सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात यावेत,असे आदेश जलसंपदा मंत्री नाम.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.मंत्री महोदयांनी सकारात्मक निर्णय देवून पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी मंत्री महोदयांचे आभार मानले.
——————————————————————————
More Stories
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा
स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिन व जयंती दिनानिमित्त सांगोल्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन