मुस्लिम समाजाकडून माजी आमदार दीपकआबांचा सत्कार
सांगोला :
माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केल्यानंतर ते सांगोल्यात येताच त्यांचे मुस्लिम समाजाकडून स्वागत व सत्कार करण्यात आला.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दीपकआबांना आमदार करण्यासाठी पायाला भिंगरी बांधून प्रचार करण्याचा विश्वास यावेळी मुस्लिम समाजाकडून देण्यात आला.
माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही वाढली आहे.पक्ष प्रवेश केल्यानंतर दीपकआबा साळुंखे-पाटील हे सांगोल्यात आल्यानंतर मुस्लिम समाजाकडून दीपकआबांचा सत्कार करण्यात आला.या विधानसभेच्या निवडणुकीत पायाला भिंगरी बांधून घराघरात विजयाची मशाल पोहोचवणार असून दीपकआबांना विक्रमी मताधिक्य देण्यासाठी जीवाचे रान करण्याचा निर्धार मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी दीपकआबांजवळ व्यक्त केला.
यावेळी माजी नगरसेवक जुबेरभाई मुजावर,रियाजभाई मुजावर,पोपट खाटीक,मोहसीन मणेरी,बाकीर मुलाणी सर,फिरोज मुलाणी,महंमदगौस मुजावर सर,नूर मणेरी,मिनाज मुलाणी,खलील शेख यांच्यासह मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
—————————————————————