नाझरे-आटपाडी-म्हसवडमार्गे जाणारी सांगोला-पुणे एसटी बस सेवा शनिवारपासून होणार सुरु
प्रवाशी सेवा संघाच्या पाठपुराव्याला यश
नाझरे/प्रतिनिधी :
नाझरे व परिसरातील प्रवाशांना म्हसवड गोंदवले व पुणे येथे जाण्यासाठी गैरसोय होत असल्यामुळे या भागातून डायरेक्ट पुणे बस सुरु व्हावी,अशी या भागातील प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती.प्रवाशांच्या या मागणीबाबत
प्रवाशी सेवा संघाने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून नाझरे-आटपाडी-म्हसवडमार्गे जाणारी सांगोला-पुणे एसटी बस सेवा शनिवारपासून सुरु होणार असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
नाझरे-आटपाडी-म्हसवडमार्गे जाणारी सांगोला-पुणे ही एसटी बस सेवा सुरु करण्याविषयी प्रवाशांकडून एसटी महामंडळाकडे व प्रवाशी सेवा संघाकडे मागणी करण्यात आली होती.याबाबत नाझरे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन झाडबुके गुरुजी,पत्रकार रविराज शेटे व तातोबा वाघमारे यांचेवतीने प्रवाशी सेवा संघ व एस.टी.महामंडळाकडे देण्यात आले होते.
याबाबत प्रवाशी सेवा संघांचे संजय पाटील,नंदू दळवी,कुमार नरखडे यांनी महाव्यवस्थापक मुंंबई व विभाग नियंत्रक,सोलापूर यांचेकडे पाठपुरावा केला होता.अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सांगोला-पुणे-स्वारगेट ही बस दि.२६-१०-२०२४ पासून सांगोला स्थानकातून सुटणार आहे.
या भागातील प्रवाशांच्या मागणीचा विचार करुन प्रवाशी सेवा संघाने पाठपुरावा केला तसेच सदरची सेवा सुरु करण्यास सांगोला आगार प्रमुख श्री.पोपळे,श्री.पंकज तोंडे,श्री.पारसे, श्री.कदम व इतर सर्वांनी सहकार्य केले.त्याबद्दल नाझरे व परिसरातील प्रवाशांकडून त्यांचे आभार मानले जात आहे.या बस सेवेमुळे आता नाझरे येथूनच डायरेक्ट पुणे येथे ये-जा करणे अंत्यत सोईचे झाले असून प्रवाशांनी खाजगी वाहनाने प्रवास न करता नव्याने सुरु होत असलेल्या याच बसने प्रवास करावा, असे आवाहन सांगोला आगाराकडून व प्रवाशी सेवा संघाकडून करण्यात येत आहे.
—————————————————————
: नाझरेमार्गे सांगोला-पुणे बसचे वेळापत्रक :
सांगोला स्थानकातून सकाळी ८.३० वा.सुटणार असून ती सांगोला-नाझरे-आटपाडी-दिघंची-म्हसवड-गोंदवले-दहिवडी-फलटण-जेजुरी- सासवड-हडपसर मार्गे पुणे स्वारगेट अशी सुरु होणार असून ती पुणे येथे दुपारी ३.३० वा. पोहचेल.तर,हीच बस दुसऱ्या दिवशी पुणे येथून सकाळी ७.३० वा.सुटणार असून ती वरील मार्गे सांगोला येथे दु.२ वा. पोहचेल.
——————————————————————