सामाजिक

बेरोजगार मुक्त भारत करण्याचे प्रथम एज्युकेशनचे उद्दिष्ट – सुधाकर भदरगे

सांगोला :

             रमाई स्मृति दिनानिमीत्त देशभरात एका वर्षात कम्युनिटी बेस ३० हजार तर,सेंटरच्या माध्यमातून ३० हजार असे ६० हजार प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार निर्माण करणार,अशी घोषणाच करण्यात आली असून प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचा हा उद्देशच असल्याने त्याकरिता गावागावातून अनेक प्रतिष्ठित व विविध संघटना,पक्ष नेते व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे.विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय अपुरी आहे.त्यातल्या त्यात रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करणारी कौशल्यही निर्माण करण्यावर भर देणारी प्रथम एज्युकेशन ही संस्था असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे.नाममात्र अर्थात मोफत प्रशिक्षण देऊन कौशल्यावर आधारित समृध्द देश घडवणे आणि बेरोजगार मुक्त भारत करण्याचे प्रथम एज्युकेशनचे उद्दिष्ट असल्याचे मत राज्य समन्वयक सुधाकर भदरगे यांनी व्यक्त केले.

रमाई स्मृती दिनानिमित्त प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे राज्य समन्वयक सुधाकर भदरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत,बहुजन नेते व तालुका संघटक बापूसाहेब ठोकळे तसेच माजी नगरसेवक किशोर बनसोडे, अस्तित्व सामाजिक संघटनेचे शहाजी गडहिरे,माजी सरपंच चिदानंद स्वामी,विद्यमान सरपंच गडहिरे मॅडम तसेच ऍड.सोमनाथ ऐवळे,विकास गडहिरे,पत्रकार सचिन गडहिरे,मुख्याध्यापक तथा शिक्षक युवक नेते जितेंद्र गडहिरे,समाजसेविका सुशीलाताई खरात यांच्या उपस्थितीत फूड अँड ब्रेवरीज हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले.

माजी नगरसेवक किशोर बनसोडे यावेळी बोलताना म्हणाले की,मानव कल्याण साधण्याकरिता आणि आपल्या विकासाकरिता प्रथम एज्युकेशन फाउंडेशन हा आपल्या दारी आलेला असून त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपण आपलं जीवन संसार सुखी-समाधानी करावं आणि सर्वांना देखील समाधानी करावं.भारतात पाण्याचा मोठा लोंढा हा माणसाला बुडवण्यासाठी नाही तर,त्याला पोहायला शिकवण्यासाठी येत असतो,अशी भूमिका घेऊन आपलं ज्ञान आत्मसात करा आणि आयुष्य मंगलमय करा,अशी भूमिका मांडली. सदर कार्यक्रमाचा समारोप शेवटी युवक नेते शहाजी गडहिरे यांनी केला.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button