शैक्षणिक
कडलास हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रतिभा लिगाडे सेवानिवृत्त
सांगोला :
श्री छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ,कडलास संचलित,कडलास हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रतिभा लिगाडे मॅडम या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
प्रतिभा लिगाडे मॅडम यांनी २१ डिसेंबर १९८५ पासून आजअखेर तब्बल ३८ वर्ष ५ महिने ११ दिवस ज्ञानदान केले. एक विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून लिगाडे मॅडमचा नावलौकिक असून शांत,संयमी व समाजसेवेची आवड असलेल्या लिगाडे मॅडम या ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्या.
सेवानिवृत्तीनंतर शेती व्यवसाय सांभाळत समाजसेवा करण्याचा मानस असल्याचे सांगून संस्था,शाळा व ग्रामस्थांनी आजतागायत दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले.
———————————————————————————