सामाजिक

निराधार नवनाथ मोरेला माजी आमदार दीपकआबांनी दिला घराचा आधार

 

सांगोला :

ऊसतोडीला जावून कष्टाने रोजीरोटी मिळवत पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणारा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रवक्ता असलेल्या आपल्या एका गरीब धनगर कुटुंबातील कार्यकर्त्याला राहण्यासाठी घर नसल्याचे अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांना लक्षात येताच त्यांनी स्वत: पुढाकार घेवून पक्षातील इतर कार्यकर्त्यांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून पक्के घर बांधून देत निराधार नवनाथ मोरेला घराचा आधार मिळवून दिला आणि
एक इतिहास रचला.

ऊसतोडीला जावूनही पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्याची घराची अडचण दूर करुन सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने गरीब कार्यकर्त्याचा संसार थाटण्याचा साकार केलेला हा आदर्श उपक्रम सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला असून संपूर्ण महाराष्ट्रातील इतर राजकिय पक्षातील लोकांसाठीही हा एक ऐतिहासिक आदर्श असल्याची चर्चा सांगोल्यासह सोलापूर जिल्ह्यात होत आहे.

परिस्थितीशी झगडत असताना ऊसतोड व शेतमजूरी, अशी पडेल ती कामे करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शिरभावी (ता.सांगोला) येथील कार्यकर्ता नवनाथ मोरे याने दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.पक्षात आल्यानंतर त्याच्या कार्याची धडपड पाहून आबांनी त्यास सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्ष प्रवक्ता म्हणून त्याची निवड केली.त्यानंतर, त्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रामाणिकपणे संघटन वाढवण्याचे काम केले.परंतु अशा या गरीब कार्यकर्त्याच्या कुटुंबातील लोकांना राहण्यासाठी घरही नसल्याची बाब दीपकआबा यांच्या लक्षात आल्याने त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करुन नवनाथ मोरे यास कार्यकर्त्यांच्या मदतीने घर बांधून देण्याचा संकल्प केला.नेत्याच्या या संकल्पाला त्यांच्या कार्यकर्त्यांनीही प्रामाणिक साथ देत वर्गणी गोळा करुन नवनाथ मोरे यास पक्के घर बांधून दिले.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही आपल्या नेत्याचा आदेश पाळत एका सामान्य परंतु पक्षासाठी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्याला त्याचे हक्काचे घर बांधून देत महाराष्ट्रापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button