सांगोला :
पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी पंतप्रधान देवेगौडा या दोघांनीही ओबीसी समाजावर अन्याय केला म्हणून त्यांच्यावर व त्यांच्या पक्षावर ओबीसीने विश्वास ठेवला नाही. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी आपल्या राज्यात जसा सामाजिक न्याय दिला,तसाच न्याय युपीएच्या माध्यमातून सर्व राज्यात देवू, जातनिहाय जनगणना करु, ओबीसींना न्याय देऊ,असे काँग्रेसने कर्नाटकात सांगितले म्हणून ओबीसी ने बीजेपीला विजयापासून वंचित केले आणि काँग्रेसला मतदान केले.कर्नाटकात बीजेपीचा ओबीसी ने सुपडा साफ केला असून “जो ओबीसी की बात करेगा,वही भारत पे राज करेगा”,अशी प्रतिक्रिया कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी दिली.
यावेळी बोलताना शंकरराव लिंगे पुढे म्हणाले की, आता कर्नाटकात ओबीसी मुख्यमंत्री झालाच पाहीजे, ही काँग्रेसची जबाबदारी आहे तरच,तेलंगणा,मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमध्ये यूपीए विजयी होईल. तसेच २०२४ ची लोकसभेची निवडणूक ही यूपीए सहज जिंकेल, असा विश्वास ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी यावेळी व्यक्त केला.
—————————————————————————
More Stories
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सांगोल्याचे नूतन सभापती व उपसभापती स्वीकारणार पदभार
सांगोल्याच्या सभापती पूनम इंगवले यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे सांगोल्याच्या राजकारणाचा झालायं पार बट्ट्याबोळ