कर्नाटकातील कॉंग्रेसच्या विजयामुळे सांगोल्यात जल्लोष

 

सांगोला :

कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाला ‘न भूतो न भविष्यती’असे बहुमत मिळाल्यामुळे आनंदीत होवून सांगोल्यात काँग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत,फटाके फोडून व लाडूचे वाटप करुन जल्लोष साजरा केला.

कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणूकीचा निकाल शनिवारी जाहीर झाल्यानंतर,काँग्रेस पक्षाला मिळालेल्या भरघोस यशामुळे सांगोला येथील काँग्रेस पक्षाच्या जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,पंडित जवाहरलाल नेहरु,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन गुलालाची उधळण करत, फटाके फोडून व लाडूचे वाटप करुन जल्लोष साजरा केला.

यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे,महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा मैनाताई बनसोडे,शिवसेना तालुका समन्वयक भारत मोरे,शहर प्रमुख कमरूद्दीन खतीब,शिवसेना युवा नेते तुषार इंगळे,सांगोला विभाग प्रमुख रघुनाथ ऐवळे,अजित गोडसे, नितीन चव्हाण,शिवसेना नेते गोरख येजगर, अमर साळुंखे,शेखर गडहिरे, अभिजीत कांबळे,सिध्देश्वर देशमुख, आकाश वाघमारे,गणेश लोखंडे,बंटी कांबळे,अविनाश कांबळे,संजय शिंदे टीपू काझी,अक्षय रणदिवे,सुरज कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
—————————————————————————