महिलांच्या कला गुणांना वाव मिळाल्यास महिलाही विविध क्षेत्रात अव्वल कामगिरी करतात – डॉ.निकिताताई देशमुख
सांगोला :
प्रत्येक महिला ही स्वतःच्या संसारासाठी,पतीसाठी, मुलाबाळांची काळजी घेणेसाठी व वडीलधाऱ्यांची सेवा करण्यासाठी सातत्याने झटत असते.महिला गृहिणी असो,नोकरदार असो किंवा व्यावसायिक असो,तिला कुटुंबाप्रती सर्व कर्तव्ये पार पाडावीच लागतात.सुशिक्षित असो वा अशिक्षित,गरीब घरातील असो वा श्रीमंत घरातील, महिलांची दैनंदिन कर्तव्ये, घरकामे व घरातील रुग्णांची सुश्रुषा ही चुकत नाही. घरातल्या लोकांच्या आवडीनिवडी, त्यांचे टाइम टेबल सांभाळताना त्यांचे स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष होते.स्वतःची तब्बेत,खाणे पिणे,हिंडणे फिरणे,मैत्रिणींना भेटणे, स्वतःचे छंद कला जोपासणे,पुरेसा आराम करणे, पथ्यपाणी जपणे याकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष होते.या सर्व दैनंदिन व्यापातून महिलांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेळच भेटत नाही,पुरुषांंप्रमाणे महिलांमध्ये सुध्दा विविध क्षेत्रांमध्ये नाविन्याने काम करण्याची क्षमता असते. परंतु त्यांना संधी भेटताना दिसत नाही. त्यामुळे स्व.आमदार डॉ.भाई गणपतरावजी देशमुख विचार मंचच्यावतीने महिला दिनानिमित्त “न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महिलांच्या कला गुणांना वाव मिळाल्यास महिलाही विविध क्षेत्रात अव्वल कामगिरी करु शकतात,असे प्रतिपादन डॉ.निकिताताई देशमुख यांनी केले.
स्वर्गीय आमदार डॉ.भाई गणपतराव देशमुख विचारमंचच्या वतीने महिला दिनानिमित्त “न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” कार्यक्रमादरम्यान न्यू इंग्लिश स्कूल ग्राउंड, सांगोला येथे त्या बोलत होत्या. यावेळी श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख,डॉ.निकिताताई बाबासाहेब देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील,सीईओ डॉ.राजलक्ष्मी गायकवाड,महिला सूतगिरणीच्या चेअरमन विमलताई कुमठेकर,माजी नगराध्यक्षा राणीताई माने, संचालिका उषाताई लोखंडे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उमाताई उंटवाले,माजी नगरसेविका छायाताई मेटकरी, माणदेशी फाउंडेशनच्या मनीषाताई मोरे,माजी नगरसेविका शोभाताई फुले,माजी नगरसेविका वैशालीताई झपके,माजी नगराध्यक्षा शकुंतलाताई केदार,पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप,माजी नगरसेविका संजीवनीताई शिंगाडे,संचालिका शारदाताई मस्के, संचालिका वृषालीताई गवळी,माजी सभापती राणीताई कोळवले,माजी नगराध्यक्षा छायाताई पाटील,संचालिका उषाताई देशमुख, संचालिका राजश्रीताई जाधव,सह्याद्री स्कूलच्या सुवर्णाताई इंगवले,आशा सलगर, सुनीताताई माळी, अर्चनाताई बंडगर,सुवर्णाताई सुरवसे, नीताताई ढोबळे,विद्याताई जाधव,माधुरी पवार,दिपाली केदार इ.महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी सीईओ राजलक्ष्मी गायकवाड म्हणाल्या की,सध्याच्या धावपळीच्या आधुनिक युगामध्ये महिलांना विविध क्षेत्रांमध्ये उच्च संधी भेटताना दिसत नाही.म्हणजे, घरामध्ये तशा पद्धतीने वातावरण निर्मिती नसते.परंतु आज स्वर्गीय आमदार डॉ.भाई गणपतराव देशमुख विचारमंचच्या वतीने महिला दिनानिमित्त “न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” या कार्यक्रमानिमित्त पाच हजाराहून जास्त महिला या ठिकाणी सहभागी होऊन उपस्थिती दर्शवणे,ही खूप मोठी बाब आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील म्हणाल्या की,महिलांचे हजारोच्या संख्येने एकत्र जमणे,ही खूप मोठी बाब आहे.आज या कार्यक्रमा निमित्त महिला एकत्र आल्या त्यामुळे,त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला व दैनंदिन घरगुती विचारापासून,कामापासून नक्कीच वेगळा श्वास घेताना पहायला मिळाल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्व.आमदार डॉ.भाई गणपतराव देशमुख विचार मंच तसेच न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले. ————————————————
महिलांना आपले आचार व विचार मांडण्याचे स्वातंत्र्य मिळाले :
सौभाग्यवती तथा विधवा महिला,वीर पत्नी महिला व माजी सैनिक पत्नी यांना विशेष आमंत्रण देण्यात आले होते.या आमंत्रणाचा मान राखून त्या महिलांनी यामध्ये विशेष सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद घेतला.हे खास करून या कार्यक्रमाचे नाविन्य आहे.या कार्यक्रमादिवशी त्यांनाही मनसोक्तपणे आपले आचार,विचार मांडण्याचे स्वातंत्र्य मिळून त्यांनी आपले मनमोकळे केले. – डॉ.निकिताताई देशमुख
—————————————————————————
यशस्वी स्पर्धकांना मिळाली बक्षीसे :
न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमांमध्ये स्नेहल सागर शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावून पैठणी व फ्रिज बक्षीस जिंकले.वनिता सोमनाथ झिंजुर्डे यांनी द्वितीय क्रमांकाचे एलईडी व पैठणी बक्षीस मिळवले.शितल प्रमोद डोईफोडे यांनी तृतीय क्रमांक पटकावून पैठणी व मिक्सर बक्षीस मिळवले.निलम मणेरी यांनी चतुर्थ क्रमांक पटकावून पैठणी व गॅस शेगडी हे बक्षीस मिळवले तसेच शहाजान पठाण यांनी पाचवा क्रमांक पटकावून पैठणी व डिनर सेट असे बक्षीस मिळवले.
—————————————————————————