सांगोला शहरातील नागरिकांनी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी – मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी

सांगोला :

स्वच्छ सर्व्हेक्षण २.० व माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत सांगोला शहरातील नागरिकांनी प्रदूषण मुक्त पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी,असे आवाहन सांगोला नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी केले आहे.

फटाक्यांमधून व शोभेच्या दारुतून विषारी वायू निर्माण होतात व हे वायू मानवी जीवनाला अतिशय घातक असतात हृदयरोग,रक्तदाब,अस्थमा असणाऱ्यांना तर,हे जास्त घातक आहेच परंतु,याचबरोबर गर्भवती स्त्रिया, वृद्ध माणसे,लहान बालके यांना सुद्धा फटाक्यांपासून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा जास्त धोका आहे.फटाके वाजवताना सर्वसाधारण निरोगी व्यक्तींनाही अपचन, सर्दी खोकला,मानसिक अशांती,डोके दुखणे या व्याधी होतात.

फटाके लावताना होणारी इजा वा अपघात हा चिंतेचा विषय असून शहरात फटाक्यांपासून प्रचंड प्रमाणात ध्वनी प्रदूषण निर्माण होते, वायू प्रदूषण निर्माण होते, त्यापासून अनेक जणांना त्रास होतो व सदर बाब ही पर्यावरणाला पूरक नसून प्रदूषण करणारी आहे. त्यामुळे सांगोला शहरातील प्रत्येक नागरिकांनी दिवाळी साजरी करताना प्रदूषण मुक्त व पर्यावरण पूरक दिवाळी कशी होईल ? यावर भर देऊन आपले सण मोठ्या उत्साहात साजरे करायचे आहेत.

              तसेच सांगोला शहरात प्लास्टिक बंदी मोहीम राबवली जात असून सांगोला शहरातील नागरिकांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन दिवाळी साजरी करावी,असे आवाहन नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी केले आहे.
——————————————————————————