सांगोला :
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन करण्यात आलेल्या आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेल्या “शिवसेना” या छोट्या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले असून बुधवारी १९ जून रोजी शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनी सांगोल्यात आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
१९ जून १९६६ रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. या स्थापनेला १९ जून २०२४ रोजी ५८ वर्षे पूर्ण झाली असून सांगोला येथे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेचा ५८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेल्या शिवसेनेच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले असून ५८ वा वर्धापनदिन साजरा होत असताना, राज्यात शिवसेनेचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुशल नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या प्रकारे राज्यकारभार सुरु आहे. त्यामुळे वेगळाच आनंद व्यक्त होत असून सोशल मिडियावर देखील शिवसेनेच्या स्थापनेपासूनच्या आजवरच्या आठवणींना शिवसैनिकांनी उजाळा दिला आहे. तसेच कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या.
यावेळी युवासेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागरदादा पाटील,शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, उद्योजक बाळासाहेब आसबे, विद्यार्थी संघटनेचे तालुकाप्रमुख अजिंक्य शिंदे,प्रितिश दिघे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————————————
More Stories
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सांगोल्याचे नूतन सभापती व उपसभापती स्वीकारणार पदभार
सांगोल्याच्या सभापती पूनम इंगवले यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे सांगोल्याच्या राजकारणाचा झालायं पार बट्ट्याबोळ