सांगोला :
“शासन आपल्या दारी” अंतर्गत सांगोला तालुक्यातील नाझरा विद्यामंदीरमध्ये विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासाठी लागणारे दाखले,विद्यार्थी रहिवाशी दाखले, अल्पभूधारक दाखले व इतर आवश्यक दाखले या विविध योजनेअंतर्गत देण्यात येणारे दाखले हे तहसीलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली जागेवर देण्याचे काम चालू असून याचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांनी नाझरे (ता.सांगोला) येथे आयोजित शिबीरादरम्यान केले.
सदर शिबिरात ६८ पात्र उमेदवारांचे दाखले जागेवरच देण्यात आले असल्याचे मंडल अधिकारी हरिश्चंद्र जाधव यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी तलाठी किरण वाडीवाले,उमेश सूर्यवंशी,अपर्णा मोरे,योगिता खट्याळ, एस.के.जाधव,रोहित वासवाडे,लिंगराज आलदर इत्यादी तलाठी तसेच अव्वल कारकून कोळी व महासेतूचे सर्व कर्मचारी यांचेसह विद्यार्थी,पालक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी या सर्वांचे आभार तलाठी अपर्णा मोरे यांनी मानले.
—————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने