सांगोला :
शेतीला पाणी असेल तर जीवन समृध्द होते.सांगोला तालुक्यात तीव्र दुष्काळ पडल्याने माण नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. खासदार निंबाळकर हे दौरा अर्धवट सोडून फडणवीसांच्या भेटीला गेले आणि थेट कोयना धरणातील पाणी टेंभू योजनेतून माण नदीत सोडले. ऐन उन्हाळ्यात कृष्णा-कोयनेचे पाणी तालुक्याला मिळाल्याने माणसांची व जनावरांची तहान भागली.नीरा उजवा कालव्याच्या पाण्यासाठी मोहिते-पाटलांनी कधीही सहकार्य केले नाही.पाण्याचा लढा १९९३ पासून सुरु असून राजकारणातील ३२ वर्षे पाण्यासाठी संघर्ष केला असल्याचे सांगून तालुक्याचा दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी आणि सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मतदारांनी सहकार्य करावे आणि महायुतीचे उमेदवार खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करावे,असे आवाहन आम.शहाजीबापू पाटील यांनी केले.
माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यात गावभेट दौरा संपन्न झाला. पारे,नराळे,मानेगांव,डिकसळ,हणमंतगांव,हंगीरगे, निजामपूर,कडलास,वासुद,वाणीचिंचाळे,लोणविरे इ.गांवात गावभेट दौरा करुन मतदारांशी संवाद साधला.यावेळी संग्रामसिंह जाधवराव,उद्योगपती तथा शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर,दुर्योधन हिप्परकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
———————————————————————————
५५ वर्षात जेवढा निधी आला नाही, तेवढा निधी गेल्या ५ वर्षात आणला :
आम्ही कष्टाने आणलेल्या पाण्याचे श्रेय घेण्याचे विरोधकांचे काम सुरु आहे.आतापर्यंत निवडून आलेल्या खासदारांनी फक्त सभामंडप देवून त्यावरच राजकारण केलं आहे.मात्र, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. सिंचनासाठी पाणी नसल्याने गेली ५० वर्षे लोकांना प्रपंच चालवण्यासाठी ऊसतोडीचे काम करण्यासाठी गांव सोडावे लागले. मात्र,शहाजीबापूंनी आमदार झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न सोडवला आणि खऱ्या अर्थाने तालुक्यात हरितक्रांतीला सुरुवात झाली.आता आपल्याला हक्काचे पाणी मिळत असल्याने पाणी आणणाऱ्याला खासदार म्हणून निवडून द्यायचे आहे.
उजनीच्या दोन टीएमसी पाणी योजनेचे दोनदा भूमिपूजन झाले. पण,काम मात्र सुरु झाले नाही. त्यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार शहाजीबापू पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केल्याने सुमारे ९०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. गेल्या ५५ वर्षात जेवढा निधी आला नाही, तेवढा निधी गेल्या ५ वर्षात खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यासाठी आणला आहे.
– माजी आमदार दीपकआबा
———————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक