महत्वाच्या बातम्या
अभिषेक गहलोत सांगोल्याचे मतमोजणी निरीक्षक
सांगोला/प्रतिनिधी :
२५३-सांगोला विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही शनिवार दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरु होणार असून मतमोजणीचे कामकाज पाहण्या करिता व कामकाजावर देखरेख करण्याकरिता भारत निवडणूक आयोगाकडून “ऑब्झर्व्हर” म्हणून आयोगाचे मतमोजणी निरीक्षक अभिषेक गहलोत यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती मिडीया नोडल अधिकारी मिलिंद सावंत यांनी दिली.
सांगोला विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणी निरीक्षक (ऑब्झर्व्हर) म्हणून अभिषेक गहलोत हे सांगोल्यात उपस्थित झालेले असून ते सांगोला येथील शासकीय विश्रामगृहात वास्तव्यास आहेत.निवडणूक मतमोजणीबाबत कोणत्याही प्रकारची अडचण किंवा तक्रार असल्यास त्यांचेशी (मोबाईल नं.९३२२७७९०१६ या नंबरवर) संपर्क साधावा,असे आवाहन मिडीया नोडल अधिकारी मिलिंद सावंत (पंचायत समिती, सांगोला) यांनी केले आहे.
——————————————————————————