२०१९ च्या निवडणुकीत त्यांना जमेत न धरल्याने,दीपकआबांनी शेवटच्या क्षणी साथ दिली – आमदार शहाजीबापू पाटील

सांगोल्यात युवासेनेची मोटरसायकल रॅली व मेळावा संपन्न

सांगोला :

             सतत आमच्या विरोधकांना साथ दिल्याने सांगोल्यात विरोधकांनी अनेक वर्ष आमदारकी भोगली.त्यामुळे, विरोधकांना साथ देणार्‍या दीपकआबांनी आधी स्वत: काय केले हे तपासावे ? मग मी काय केले हे विचारावे ? असा सवाल करत मागच्या २०१९ च्या निवडणुकीत,विरोधकांनी त्यांना जमेत न धरल्याने दीपकआबांनी अगदी शेवटच्या क्षणी आम्हाला साथ दिली,अशी स्पष्टोक्ती आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला येथे युवासेनेच्या वतीने आयोजित केलेल्या मोटरसायकल रॅली व मेळाव्यादरम्यान दिली.

युवा सेनेच्या वतीने गुरुवारी आयोजित केलेल्या मोटरसायकल रॅली व मेळाव्याप्रसंगी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की,माझी आमदारकी ही तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी व तालुक्याचा विकास करण्यासाठी सार्थकी लावत असून विरोधक म्हणतात बापू दमले,पण मी दमणारा नेता नसून स्व.गणपतराव देशमुख यांच्या विरोधात ७ लढाया केलेला मी माणूस आहे.महाराष्ट्र राज्यातील जनतेचे प्रश्न व समस्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्री १८ तास वेळ देतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी व पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी उद्याची २०२४ ची विधानसभा निवडणूक मोठ्या ताकदीने लढून आपले स्वप्न पूर्ण करा.मला मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊन आमदार व पुढे नामदार होण्याची संधी द्या.आगामी ५ वर्षे ही महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठीच आहेत.सांगोला येथे झालेला युवा सेनेचा मेळावा पाहून व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून नवचैतन्य निर्माण झाले आहे. तालुक्याच्या विकासासाठी मी केलेली कामे व निघालेले जीआर पाहून विरोधकांनी बोलावे, मोघम स्वरुपात बोलू नये.तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,विजेचा प्रश्न,रस्त्याचा प्रश्न,प्रत्येक समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेली कामे याचा विचार करता तालुक्यातील जनतेने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी या मेळाव्याच्या प्रसंगी बोलताना केले.

यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक,शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे,शिवसेनेचे नेते सुभाष इंगोले,विजय शिंदे,तालुका प्रमुख दादासाहेब लवटे,दादासाहेब वाघमोडे सर,अजिंक्य पवार,दीपक दिघे,शंकर दुधाळ आदींनी आपले विचार व्यक्त केले.होलार समाजासाठी आ.शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून होलार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन जीआर समाजाच्या हाती दिला.त्याबद्दल होलार समाजाच्या वतीने आ.शहाजीबापू पाटील यांचा यासमयी भव्य सत्कार करण्यात आला.

या मेळाव्यास माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ,युवासेना सचिव किरण साळी,युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख सागरदादा पाटील,विधानसभा प्रमुख प्रा.संजय देशमुख,युवा नेते दिग्विजय दादा पाटील,युवा सेना संपर्कप्रमुख अभिजीत नलवडे,ओबीसी सेल जिल्हाप्रमुख शिवाजी घेरडे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदीश पाटील,तालुकाप्रमुख दीपक खटकाळे,शिवसेना शहर प्रमुख माऊली तेली,युवासेना शहर प्रमुख समीर पाटील, मागासवर्गीय सेलचे तालुका प्रमुख दीपक ऐवळे,प्रसिद्धीप्रमुख छोटू दौंडे यांच्यासह संपर्क प्रमुख महेश साठे,जिल्हा प्रमुख अमोल शिंदे,जिल्हा प्रमुख महेश चिवटे,बालाजी बागल,नाना मोरे,युवासेना कार्याध्यक्ष प्रियांका परंडे,युवासेना नेत्या स्नेहा चवरे,आनंद घोंगडे,सुनील पाटील यांचेसह सांगोला तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


————————————————————

मी शिंदे सरकारमध्ये गेलो नसतो तर,तालुक्यासाठी ५ हजार ५०० कोटी निधी आलाच नसता :

मी तालुक्याचा विकास सोडून एक क्षणभरही थांबलो नाही. तालुक्यातील प्रत्येक समाजाला प्रामाणिकपणे न्याय दिला आहे. तसेच तालुक्यात टेंभू,म्हैसाळ,उजनी यासह इतर योजनांचे पाणी आणून शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावला.भविष्यात सांगोल्यामध्ये एमआयडीसी आणून तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचे कार्य करायचे आहे.

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये गेलो नसतो तर, तालुक्याच्या विकासासाठी ५ हजार ५०० कोटी रुपये निधी येऊच शकला नसता.आगामी ५ वर्षात सांगोला तालुक्यासाठी पुन्हा १० हजार कोटी रुपये निधी आणून तालुका समृद्ध बनवायचं स्वप्न आहे.हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मतदारांनी पुन्हा एकदा आमदारकीची संधी द्यावी आणि भविष्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी व मला नामदार करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे.
                      – आमदार शहाजीबापू पाटील
————————————————

जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण :

सांगोल्यात शिवसेना व युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य मोटरसायकल रॅली ही पंढरपूर रोडवरुन सांगोला शहरात दाखल झाली.रॅलीदरम्यान,मान्यवरांच्या हस्ते शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन ही रॅली सदानंद हॉलमध्ये आल्यानंतर युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला.रॅलीत जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली.
————————————————