सांगोला :
अवघ्या ३-४ महिन्यांवर येवून ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर,सांगोला तालुक्यातील राजकिय हालचालींना चांगलाच वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या गांवभेट दौऱ्याचा झंजावात सध्या सुरु असून गांवभेट दौऱ्याच्या ५ व्या व ६ व्या दिवशीही दीपकआबांच्या स्वागताला वाड्या वस्त्यांवर देखील जनसागर उसळला असल्याचे चित्र दिसून येत आहे.गांवभेट दौऱ्यात जागेवरच अडचणी सुटत असल्याने आणि स्थानिक पातळीवरील अनेक अडचणींचा निपटारा होवू लागल्याने आबांच्या गावभेट दौऱ्याला वाड्या वस्त्यांवरही जनता दरबाराचे स्वरुप प्राप्त होऊ लागले आहे.
दौर्या दरम्यान,सांगोला तालुक्यातील पाचेगांव, किडबिसरी,तिप्पेहळ्ळी व जुनोनी या गावातील वाड्यांवर तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी तेथील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.पाचेगांव येथील बिलेवस्ती,घोडकेमळा,गांवभाग तसेच किडबिसरी येथील देवकते वस्ती,टेपेवस्ती व गावभाग तर, तिप्पेहळ्ळी येथील शिवेचीवस्ती,मधलावाडा व मोहितेवस्ती आणि गावभाग तसेच जुनोनी येथील बेंदवस्ती,काळूबाळूवाडी,बळवंत मळा,ढोले-तंडे वस्ती आणि जुनोनी गावभाग परिसरातील हजारो नागरिकांना भेटून दीपकआबा यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला.यावेळी,पाचेगांव बु॥ येथील महिलांनी तर,”मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजना,आधार कार्ड,रेशन कार्ड तसेच शेती आणि कौटुंबिक समस्यांबाबत आबांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या.यासमयी,दीपकआबांनी अत्यंत शांतपणे सर्व महिलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर समजूतीचा मार्ग काढून महिलांना दिलासा दिला.

तसेच लोटेवाडी गावातील सातारकर वस्ती,नवी लोटेवाडी,जुनी लोटेवाडी आणि इटकी गावातील डोंगरे-सावंत वस्ती,चव्हाण वस्ती, बुद्ध विहार,पिंटू करचे वस्ती तसेच गावभाग इटकी या परिसरातील नागरिकांना भेटून त्यांच्याशी दीपकआबांनी संवाद साधला.वाड्यावस्त्यांवरील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी गांवभेट दौऱ्यावर असलेल्या माजी आमदार दीपकआबांच्या गांवभेट दौऱ्याला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच चालला असून आबांचा झंजावात आणि नागरिकांचा आबांना मिळणारा प्रतिसाद याची सध्या सांगोला तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
————————————————————
रात्री १०-१० वाजेपर्यंत लोकांसोबत राहून केला जातोयं अडचणींचा निपटारा :
ग्रामीण भागातील तळागाळातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी व त्यांच्या व्यथा आणि वेदना जाणून घेण्यासाठी गांवभेट दौऱ्यावर असलेले दीपकआबा हे सकाळपासून संध्याकाळी उशीरापर्यंत लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत.गांव खेड्यातील आणि वाड्यावस्त्यांवरील नागरिकांच्या विवीध समस्या,रस्ते, पिण्याचे पाणी,वीजेचा प्रश्न तसेच अन्य महत्त्वाचे प्रश्न हे रात्री १०-१० वाजेपर्यंत लोकांसोबत राहून जागेवरच सोडवून दीपकआबांकडून अडचणींचा निपटारा केला जात असल्याचे चित्र सध्या सांगोला तालुक्यातील नागरिकांना पहायला मिळत आहे.
——————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक