महत्वाच्या बातम्या

जनतेचा सेवक म्हणून विकास कामांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार – आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला :

गेल्या ४-५ वर्षापासून सांगोला विधानसभा मतदार संघातील गावागावात अखंडपणे जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी समजून घेत असून जनतेने आशिर्वाद दिला असल्याने मतदार संघातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे.राज्यातील विद्यमान महायुतीचे सरकार हे जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेवून काम करीत असल्याने सांगोला तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही,अशी खात्री देत,जनतेचा सेवक म्हणून विकासकामांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहीन,अशी ग्वाही सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. 

                  सांगोल्याचे पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांनी मंजूर करुन आणलेल्या निधीमधून ५ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या सांगोला-वासुद रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे व १ कोटी ४५ लाख रु.खर्चाच्या सांगोला आठवडा बाजार मटण मार्केट (फेज २) या दोन्ही विकासकामांचे भूमिपूजन आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते शनिवारी २० जुलै रोजी सकाळी संपन्न झाले.या भूमिपूजन प्रसंगी आम.शहाजीबापू हे बोलत होते.

यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की,गेल्या ५ वर्षांत तालुक्यातील सर्वच गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोट्यावधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. तालुक्याचा विकास हे एकच ध्येय मनाशी बाळगलेले असून त्यानुसार निधी मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.गेल्या ५ वर्षांत विधानसभा मतदार संघातील रस्ते,सांस्कृतिक भवन,पाण्याच्या योजना, प्रशासकीय भवन,भुयारी गटार,दुय्यम निबंधक कार्यालय,ट्रान्सफॉर्मर,विजेचे खांब,शॉपिंग सेंटर, ईदगाह मैदान यासह सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी सुमारे ४ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.महायुतीचे सरकार हे शेतकरी,कष्टकरी व सामान्यातील सामान्यांचा विचार करणारे सरकार आहे. त्यामुळे विकासकामे करत असताना कुठलाही भेदभाव केला जात नसल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी सांगितले.
               —————————————————————

भूमिपूजन प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती :

सदर भूमिपूजन प्रसंगी माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ,डॉ.प्रदीपदादा साळुंखे-पाटील,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.सुधीर गवळी, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील,उद्योजक बाळासाहेब आसबे,भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल पवार,उद्योजक योगेश खटकाळे,माजी नगरसेवक सोमनाथ लोखंडे,माजी नगरसेवक आस्मीर तांबोळी, अरुण बिले,आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, ठेकेदार आनंद खटकाळे, समाधान खटकाळे,शिवसेना विद्यार्थी संघटनेचे तालुकाप्रमुख अजिंक्य शिंदे, शिवसेना शहरप्रमुख समीर पाटील,पोपट खाटीक, संजय केदार,भालचंद्र भंडारे,अनिल केदार (मनसे), अजय गोडसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button