लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ मतदारसंघात नेमकं कोण जिंकून येणार ?
सांगोला :
लोकसभा निवडणूकीचा निकाल आता कांही तासावर येवून ठेपला असून राज्यातील ४८ मतदारसंघात नेमकं कोण जिंकून येणार ? याबाबत देशभरातील नेतेमंडळींसह सर्वांचीच उत्सुकता ही आता शिगेला पोहचली आहे.मागील ३-४ वर्षात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं ही पूर्णपणे बदलली असल्याने मूळ शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेला विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गट व राष्ट्रवादीतून फुटून बाहेर पडलेला विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गट यांचेसह भाजपाने केलेली महायुती तसेच राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा गट व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा गट यांचेसह काँग्रेसने केलेली महाविकास आघाडी यांच्यात झालेली अटीतटीची निवडणूक त्यामुळे यंदा,महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात नेमकं कोण जिंकणार ? याबाबतचा अंदाज बांधणे कठीण असले तरी,विवीध मतदारसंघातील लोकांचा कल पाहून पुढील निष्कर्ष निघू शकतात.
शिवसेना (उबाठा) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) हे तीन पक्ष म्हणजेच महाविकास आघाडी यांनी एकत्रितपणे राज्यात निवडणूक लढवली.तर दुसरीकडे भाजप,शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) म्हणजेच महायुती मिळून निवडणूक लढवली. अशा परिस्थितीत राज्यात ४८ जागांवर नेमका कोणाचा उमेदवार जिंकणार ? याबाबत सध्या बरीच चर्चा सुरु असून एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजाचा सार पुढीलप्रमाणे.
१) मुंबई उत्तर :
पियुष गोयल (भाजप) – जिंकू शकतात तर,भूषण पाटील (काँग्रेस) – पराभवाची शक्यता
२) मुंबई उत्तर पश्चिम :
अमोल किर्तीकर (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात तर,रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट)
– पराभवाची शक्यता
३) मुंबई उत्तर पूर्व :
संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात तर,मिहीर कोटेचा (भाजप) – पराभवाची शक्यता
४) मुंबई उत्तर मध्य :
वर्षा गायकवाड (काँग्रेस) – जिंकू शकतात तर,उज्ज्वल निकम (भाजप) – पराभवाची शक्यता
५) मुंबई दक्षिण मध्य :
अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात तर,राहुल शेवाळे (शिवसेना शिंदे गट) – पराभवाची शक्यता
६) मुंबई दक्षिण :
अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात तर,यामिनी जाधव (शिवसेना शिंदे गट) – पराभवाची शक्यता
७) नंदूरबार :
गोवाल पाडवी (काँग्रेस) – जिंकू शकतात तर,हिना गावित (भाजप) – पराभवाची शक्यता
८) धुळे :
सुभाष भामरे (भाजप) – जिंकू शकतात तर,शोभा बच्छाव (काँग्रेस) – पराभवाची शक्यता
९) जळगाव :
स्मिता वाघ (भाजप) – जिंकू शकतात
करण पवार (शिवसेना ठाकरे गट) – पराभवाची शक्यता
१०) दिंडोरी :
भास्कर भगरे (NCP शरद पवार) – जिंकू शकतात तर,भारती पवार (भाजप) – पराभवाची शक्यता
११) नाशिक :
राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात तर,हेमंत गोडसे (शिवसेना शिंदे गट) – पराभवाची शक्यता
शांतीगिरी महाराज (अपक्ष)
– तिसऱ्या स्थानी
१२) बुलढाणा :
नरेंद्र खेडेकर (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात तर,प्रताप जाधव (शिवसेना शिंदे गट) – पराभवाची शक्यता
रविकांत तुपकर (स्वाभिमानी शेतकरी पक्ष) – तिसऱ्या स्थानी
१३) अकोला :
अभय पाटील (काँग्रेस) – जिंकू शकतात तर,अनुप धोत्रे (भाजप) – पराभवाची शक्यता व प्रकाश आंबेडकर (वंचित) – तिसऱ्या स्थानी
१४) अमरावती :
नवनीत राणा (भाजप) – जिंकू शकतात तर,बळवंत वानखेडे (काँग्रेस) – पराभवाची शक्यता
दिनेश बूब (प्रहार) – तिसऱ्या स्थानी
१५) वर्धा :
अमर काळे (NCP शरद पवार) – जिंकू शकतात तर,रामदास तडस (भाजप) – पराभवाची शक्यता
१६) रामटेक :
राजू पारवे (शिवसेना शिंदे गट) – जिंकू शकतात तर,श्यामकुमार बर्वे (काँग्रेस) – पराभवाची शक्यता
किशोर गजभिये (अपक्ष) – तिसऱ्या स्थानी
१७) नागपूर :
नितीन गडकरी (भाजप) – जिंकू शकतात तर,विकास ठाकरे (काँग्रेस) – पराभवाची शक्यता
१८) भंडारा-गोंदिया :
प्रशांत पडोळे (काँग्रेस) – जिंकू शकतात तर,सुनील मेंढे (भाजप) – पराभवाची शक्यता
१९) गडचिरोली चिमूर :
नामदेव किरसान (काँग्रेस) – जिंकू शकतात तर,अशोक नेते (भाजप) – पराभवाची शक्यता
२०) चंद्रपूर :
प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) – जिंकू शकतात तर,सुधीर मुनगंटीवार (भाजप) – पराभवाची शक्यता
२१) यवतमाळ वाशिम :
संजय देशमुख (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात तर,राजश्री पाटील (शिवसेना शिंदे गट) – पराभवाची शक्यता
२२) हिंगोली :
नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात तर,बाबूराव कदम (शिवसेना शिंदे गट) – पराभवाची शक्यता व बी.डी.चव्हाण (वंचित) – तिसऱ्या स्थानी
२३) नांदेड :
वसंतराव चव्हाण (काँग्रेस) – जिंकू शकतात तर,प्रतापराव चिखलीकर (भाजप) – पराभवाची शक्यता
२४) परभणी :
संजय (बंडू) जाधव (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात तर,महादेव जानकर (रासप) – पराभवाची शक्यता
२५) जालना :
कल्याण काळे (काँग्रेस) – जिंकू शकतात तर,रावसाहेब दानवे (भाजप) – पराभवाची शक्यता
२६) छत्रपती संभाजीनगर :
चंद्रकांत खैरे (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात तर,संदिपान भुमरे (शिवसेना शिंदे गट) – पराभवाची शक्यता व इम्तियाज जलील (MIM) – तिसऱ्या स्थानी
२७) धाराशिव :
ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात तर,अर्चना पाटील (NCP अजित पवार) – पराभवाची शक्यता
२८) लातूर :
शिवाजी काळगे (काँग्रेस) – जिंकू शकतात तर,सुधाकर श्रृंगारे (भाजप) – पराभवाची शक्यता
२९) बीड :
पंकजा मुंडे (भाजप) – जिंकू शकतात तर,
बजरंग सोनावणे (NCP शरद पवार) – पराभवाची शक्यता
३०) पालघर :
हेमंत सावरा (भाजप) – जिंकू शकतात तर,भारती कामडी (शिवसेना ठाकरे गट) – पराभवाची शक्यता
३१) भिवंडी :
सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) (NCP शरद पवार) – जिंकू शकतात तर,कपिल पाटील (भाजप) – पराभवाची शक्यता
३२) कल्याण :
श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट) – जिंकू शकतात तर,वैशाली दरेकर (शिवसेना ठाकरे गट) – पराभवाची शक्यता
३३) ठाणे :
राजन विचारे (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात तर,नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट) – पराभवाची शक्यता
३४) रायगड :
सुनील तटकरे (NCP अजित पवार) – जिंकू शकतात तर,अनंत गीते (शिवसेना ठाकरे गट) – पराभवाची शक्यता
३५) मावळ :
श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट) – जिंकू शकतात तर,संजोग वाघेरे (शिवसेना ठाकरे गट) – पराभवाची शक्यता
३६) रत्नागिरी-सिंधुदुर्ग :
नारायण राणे (भाजप) – जिंकू शकतात तर,विनायक राऊत (शिवसेना ठाकरे गट) – पराभवाची शक्यता
३७) पुणे :
रवींद्र धंगेकर (काँग्रेस) – जिंकू शकतात तर,मुरलीधर मोहोळ (भाजप) – पराभवाची शक्यता
वसंत मोरे (वंचित) – तिसऱ्या स्थानी
३८) बारामती :
सुप्रिया सुळे (NCP शरद पवार) – जिंकू शकतात तर,सुनेत्रा पवार (NCP अजित पवार) – पराभवाची शक्यता
३९) शिरुर :
अमोल कोल्हे – (NCP शरद पवार) – जिंकू शकतात तर,शिवाजीराव आढळराव (NCP अजित पवार) – पराभवाची शक्यता
४०) अहमदनगर :
निलेश लंके (NCP शरद पवार) – जिंकू शकतात तर,
सुजय विखे (भाजप) – पराभवाची शक्यता
४१) शिर्डी :
भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात तर,सदाशिव लोखंडे (शिवसेना शिंदे गट) – पराभवाची शक्यता
४२) रावेर :
रक्षा खडसे (भाजप) – जिंकू शकतात तर,श्रीराम पाटील (शरद पवार गट) – पराभवाची शक्यता
४३) सोलापूर :
प्रणिती शिंदे (काँग्रेस) – जिंकू शकतात तर,राम सातपुते (भाजप) – पराभवाची शक्यता
४४) माढा :
धैर्यशील मोहिते-पाटील (NCP शरद पवार) – जिंकू शकतात तर,रणजीतसिंह निंबाळकर (भाजप) – पराभवाची शक्यता
४५) सांगली :
विशाल पाटील (अपक्ष) – जिंकू शकतात तर,
संजयकाका पाटील (भाजप) – पराभवाची शक्यता व चंद्रहार पाटील (शिवसेना ठाकरे गट) – तिसऱ्या स्थानी
४६) सातारा :
शशिकांत शिंदे (NCP शरद पवार) – जिंकू शकतात तर, उदयनराजे भोसले (भाजप) – पराभवाची शक्यता
४७) कोल्हापूर :
शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस) – जिंकू शकतात तर,संजय मंडलिक (शिवसेना शिंदे गट) – पराभवाची शक्यता
४८) हातकणंगले :
सत्यजीत पाटील (शिवसेना ठाकरे गट) – जिंकू शकतात तर,धैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट) – पराभवाची शक्यता व राजू शेट्टी (शेतकरी स्वाभिमानी पक्ष) – तिसऱ्या स्थानी
वरील अंदाजानुसार,महाविकास आघाडीला राज्यात ४८ पैकी तब्बल ३४ जागा मिळू शकतील. ज्यामध्ये शिवसेना (उबाठा गट) १४ जागा जिंकू शकते तर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ८ जागा आणि काँग्रेसला १२ जागांवर विजय मिळू शकतो.तर, महायुतीला राज्यात ४८ पैकी केवळ १३ जागांवरच विजय मिळू शकतो,असा आहे.ज्यामध्ये, शिवसेना (शिंदे गट) यांना केवळ ३ जागा जिंकता येतील तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळवता येईल आणि भाजपला फक्त ९ जागांवर विजय मिळेल तसेच सांगलीची जागा अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे जिंकतील,असा अंदाज आहे.
———————————————————————————